DRDOने मोबाइल मेटलिक रॅम्प (MMR) भारतीय सैन्याकडे सुपूर्द केला : भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेनी (DRDO) विकसित केलेल्या मोबाइल मेटलिक रॅम्प (MMR) भारतीय सैन्याकडे सुपूर्द केले. 70 मेट्रिक टन (MT) एवढा भार सहन करू शकणार्…
DRDOने मोबाइल मेटलिक रॅम्प (MMR) भारतीय सैन्याकडे सुपूर्द केला :
- भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेनी (DRDO) विकसित केलेल्या मोबाइल मेटलिक रॅम्प (MMR) भारतीय सैन्याकडे सुपूर्द केले. 70 मेट्रिक टन (MT) एवढा भार सहन करू शकणार्या MMRची रचना व विकास DRDOच्या एका केंद्राने केला.
- मोबाइल मेटलिक रॅम्प (MMR) हा पूलाचा एक प्रकार आहे, जो गाडीच्या मदतीने कुठेही सोबत घेवून जाता येतो. या यंत्रणेमुळे सैन्याच्या सशस्त्र वाहनांच्या चळवळीला लागणारा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.
प्रथम तिमाहीत भारताचा GDP वृद्धीदर 5.7% पर्यंत आणखी मंदावला आहे: नोमुरा अहवाल
- नोमुरा या सल्लागार संस्थेच्या “कॉम्पोजिट लिडिंग इंडेक्स (CLI)” शीर्षकाच्या अहवालानुसार, कमी मागणी, कमकुवत गुंतवणूक आणि सेवा क्षेत्रातल्या कमकुवत कामगिरीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून या काळात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वृद्धीदर आणखी कमी होणार असून तो 5.7 टक्क्यांवर जाणार असा अंदाज बांधण्यात आला आहे.
- असे असूनही अर्थव्यवस्था जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत काही प्रमाणात सुधारणार अशी अपेक्षा आहे.
अहवालातले ठळक मुद्दे
1) जुलै महिन्यातल्या आकडेवारीत असे दिसून आले आहे की जूनमधील 31 टक्क्यांच्या तुलनेत 53 टक्के निर्देशके सुधारले आहेत.
2) जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतला कॉम्पोजिट लिडिंग इंडेक्स द्वितीय तिमाहीच्या 99.8 वरून किंचित वाढीसह 99.9 वर झाला आहे. हा उच्च औद्योगिक उत्पादनातल्या वाढीचा परिणाम आहे.
3) 2018-19 या आर्थिक वर्षातला भारताचा आर्थिक वाढीचा दर 6.8 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे, जो 2014-15च्या तुलनेत सर्वाधिक कमी आहे.
प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांचे निधन :
- ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे 19 ऑगस्ट 2019 रोजी मुंबईत निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. मोहम्मद जहूर 'खय्याम' हाशमी हे खय्याम ह्यांचे पूर्ण नाव होते.
- बालपणापासूनच संगीत साधना करणाऱ्या खय्याम यांनी वयाच्या सतराव्या वर्षी पंजाबमध्ये लुधियाना शहरातून संगीत क्षेत्रातल्या कारकीर्दीला सुरुवात केली. कभी-कभी, उमराव जान, नूरी, रझिया सुलतान, बाजार यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी अविस्मरणीय संगीत दिले.
- सन 1953 ते सन 1990 या कालावधीत त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. 1953 साली त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण 1961 साली 'शोला और शबनम' या सिनेमाला दिलेल्या संगीतामुळे खय्याम यांना संगीतकार म्हणून एक नवी ओळख मिळाली. आपल्या उत्कृष्ट कामासाठी त्यांना अनेक पुरस्कारही देण्यात आले आहेत. पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. 2010 साली खय्याम यांना संगीतक्षेत्रातल्या अतुलनीय योगदानासाठी 'फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार' देण्यात आला.
अपॉफिस लघुग्रहाच्या आघाताचा पृथ्वीला धोका :
- अपॉफिस या ‘गॉड ऑफ केऑस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या लघुग्रहाची धडक पृथ्वीला १३ एप्रिल २०२९ रोजी बसण्याची शक्यता असून त्यात पृथ्वीचे मोठे नुकसान होऊ शकते, अशी भीती अब्जाधीश तंत्रज्ञ उद्योजक व ‘टेस्ला’ तसेच ‘स्पेसएक्स’चे संस्थापक इलन मस्क यांनी व्यक्त केली आहे.
- हा लघुग्रह पृथ्वीवर धडकण्याची शक्यता असून आता त्याला तोंड देण्याची तयारी करण्यासाठी केवळ दहा वर्षे हातात आहेत, असे सांगून ते म्हणाले, ३४० मीटरचा हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता ४५ हजारांत एक आहे. तो पृथ्वीला धक्का देऊन जाण्याची शक्यता आहे कारण त्या वेळी हा लघुग्रह पृथ्वीच्या तीस हजार किलोमीटर जवळ येणार आहे. मानवी इतिहासात पृथ्वीवर आदळलेल्या लघुग्रहापैकी तो सर्वात घातक ठरू शकतो. सध्या तरी त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याकडे कुठलीच यंत्रणा नाही.
- या संभाव्य आघाताबाबत त्यांनी भीती व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे, धोका आहे पण बचाव नाही ही सध्याची स्थिती आहे. अमेरिकेच्या नासा या संस्थेने या लघुग्रहाचा अभ्यास सुरू केला असून तो लघुग्रह धोक्याचा असल्याचे त्यातून मान्य केले आहे, असे असले तरी या लघुग्रहापासून बचाव करण्यासाठी नेमकी कशी यंत्रणा असावी हे अजून नासालाही निश्चित करता आलेले नाही. त्याचा मुकाबला करण्यासाठी या वर्षी नासाने ‘दी डबल अॅस्टरॉइड रिडायरेक्शन टेस्ट’ ही योजना जाहीर केली होती.
उल्लेखनीय कार्याबद्दल १६ जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव :
- प्रशासकीय सेवेचा समाजहितासाठी उपयोग करून परिवर्तन घडविणाऱ्या देशभरातील १६ जिल्हाधिकाऱ्यांचा बुधवारी ‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला. यात अकोला, नवी मुंबई, उस्मानाबाद आणि नागपूर येथे कार्यरत असताना दिलेल्या योगदानाबद्दल अनुक्रमे आस्तिक कुमार पांडे, तुकाराम मुंढे, डॉ. प्रशांत नारनवरे आणि माधवी खोडे-चावरे यांनाही सन्मानित करण्यात आले.
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामविलास पासवान, रविशंकर प्रसाद, डॉ. जितेंद्र सिंग आणि ‘एक्स्प्रेस वृत्तसमूह’ संचालक मंडळाचे अध्यक्ष विवेक गोएंका हे यावेळी उपस्थित होते.
सीरिज डी फंडिंगमध्ये शेअरचॅटने 100 दशलक्ष डॉलर्स जमा केले :
- ट्विटर आणि ट्रस्टब्रिज पार्टनर्सच्या सहभागाने शेअर चॅट या प्रांतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने आपल्या मालिका डी फंडिंगमध्ये 100 दशलक्ष डॉलर्स जमा केले आहेत. शेअरचॅटने 224 दशलक्ष डॉलर्स जमा केले आहेत. शुन्वे कॅपिटल, लाइटस्पीड व्हेंचर पार्टनर्स, एसएआयएफ कॅपिटल, इंडिया क्वांटियंट आणि मॉर्निंग्जसाईड व्हेंचर कॅपिटलसह विद्यमान गुंतवणूकदारांनीही या निधीच्या फेरीत भाग घेतला.
- निधीची ही नवीन फेरी कंपनी आपला व्यवसाय वाढवत असल्याचा भास करत असल्याने शेअर चॅटला त्याच्या व्यासपीठासाठी तंत्रज्ञानाची पायाभूत सुविधा मजबूत करण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त, शेअर चॅट त्याच्या सामरिक भागीदारांमध्ये कल्पनांच्या देवाणघेवाण करण्यास मदत करण्यासाठी प्रतिभा प्राप्त करेल. तसेच, कंपनी भारतात इंटरनेट इकोसिस्टमला गती देण्यासाठी अनुभवांना अखंडित करण्यासाठी अधिक वैशिष्ट्ये सादर करेल.
No comments