Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 16 August 2019

पी. टी. उषा: आशियाई क्रिडापटू संघाच्या क्रिडापटू आयोगाच्या सदस्य : भारतीय धावपटू पी. टी. उषा यांना आशियाई क्रिडापटू संघाच्या (AAA) क्रिडापटू आयोगाच्या (Athletes Commission) सदस्य बनविण्यात आले आहे.आशियाई क्रिडापटू संघाच्या (AAA) क…

पी. टी. उषा: आशियाई क्रिडापटू संघाच्या क्रिडापटू आयोगाच्या सदस्य :
  • भारतीय धावपटू पी. टी. उषा यांना आशियाई क्रिडापटू संघाच्या (AAA) क्रिडापटू आयोगाच्या (Athletes Commission) सदस्य बनविण्यात आले आहे.
  • आशियाई क्रिडापटू संघाच्या (AAA) क्रिडापटू आयोगाचे अध्यक्षपद 1992 ऑलंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या हातोडा फेकपटू उझबेकिस्तानच्या अँड्रे अब्दूवालीयेव्ह असणार आहे. आशियामधली आघाडीची धावपटू ठरणारी 55 वर्षीय पी. टी. उषा या क्रिडापटू आयोगाच्या सहा सदस्यांपैकी एक असणार.
  • आयोगाचे इतर सदस्य ओल्गा रीपाकोवा (कझाकस्तान)वांग यू (चीन)ली हूप वेई (मलेशिया) आणि साद शादाद (सौदी अरब) हे आहेत.
  • 'पायोली एक्सप्रेसम्हणून ओळखल्या जाणार्‍या पी. टी. उषा यांनी 1980च्या दशकात अनेक आशियाई स्पर्धा गाजवल्या. त्यांनी सोलमध्ये 1986 साली आशियाई खेळात चार सुवर्ण पदके आणि एक कांस्यपदक जिंकले होते. त्याच्या एक वर्षापूर्वीजकार्तामध्ये आशियाई स्पर्धेत पाच सुवर्ण आणि एक कांस्य पदके पटकावली होती.

गृहनिर्माण वित्त कंपन्यांना NBFC कंपन्या गृहीत धरल्या जाणार: वित्त मंत्रालय
  • भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (नॅशनल हाउसिंग बँक -NHB) या संस्थेची जागा घेतली. त्यामुळे ती आता गृहनिर्माण वित्त संस्थांची नियामक संस्था म्हणून काम करणार आहे.
  • 13 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी घोषणा केली होती की गृहनिर्माण वित्त कंपन्यांना (HFCs) नियमनाच्या कामकाजासाठी बिगर-बँकिंग वित्त कंपन्यांच्या (NBFCs) श्रेणींमधील एक गृहीत धरले जाणार आणि त्या RBIच्या थेट देखरेखीखाली येतील.
  • त्यासाठी वित्त (क्रमांक 2) कायदा-2019’ (2019 चे 23) याने राष्ट्रीय गृहनिर्माण बँक कायदा-1987’ यामध्ये दुरूस्ती करण्यात आली आहे.

 ग्राहकांना वाढविण्यासाठी आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सचा अ‍ॅक्सिस बँकेसोबत करार :
  • आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स को. लिमिटेड (ABHICL) या कंपनीने अ‍ॅक्सिस बँकेबरोबर एक बॅंक अशुरन्स करार केला आहे.
  • बँकेच्या देशभरातल्या ग्राहकांना समग्र आरोग्य विमा उपाय देऊन व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा करार केला गेला आहे. आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स को. लिमिटेड (ABHICL) ही आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड (ABCL) याची उपकंपनी आहे.
  • ही भागीदारी ABHICLला भौतिक आणि डिजिटल चॅनलद्वारे बँकेच्या विद्यमान व नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणार आणि हेल्थ रिटर्न्स टीएमक्रोनिक मॅनेजमेंट प्रोग्राम यांसारख्या त्याच्या उपक्रमांचा फायदा दिला जाणार आहे.

भारताची संयुक्त राष्ट्रसंघाच्या SPTF कोषात 1 दशलक्ष डॉलरची भागीदारी :
  • रेसिडेंट कोऑर्डींनेटर सिस्टमसाठी भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्पेशल पर्पज ट्रस्ट फंड (SPTF) या कोषात भारताचे योगदान म्हणून 1 दशलक्ष अमेरिकी डॉलर एवढी रक्कम कोषाकडे सुपूर्द केली आहे.
  • स्पेशल पर्पज ट्रस्ट फंड (SPTF) हा एक विशिष्ट कोष आहे जो संयुक्त राष्ट्रसंघ सचिवालयात स्थापित केलेला एक नवा कोष आहे. हा नव्या रेसिडेंट कोऑर्डींनेटर सिस्टमचे सर्व योगदान आणि आर्थिक व्यवहार पारदर्शक आणि प्रभावी मार्गाने प्राप्त करण्यासाठीएकत्रित करण्यासाठीव्यवस्थापित करण्यासाठी आहे.

धोनीची काश्मिरी खेळाडूंसाठी क्रिकेट अकादमी स्थापन करण्याची तयारी :
  • भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीजम्मू-काश्मीरमधील खेळाडूंसाठी क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या तयारीत आहे. काश्मीरमधल्या तरुण खेळाडूंना धोनीच्या अकादमीत मोफत प्रशिक्षण घेता येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी यासंदर्भात केंद्रीय क्रीडा मंत्रालयाशीही चर्चा करणार असल्याचं समजतंय.
  • धोनीने सध्या महिने क्रिकेटमधून विश्रांती घेतली असून तो भारतीय सैन्यदलाच्या 106 TA Battalion (Para) तुकडीत काम करत आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं 370 कलम केंद्रीय गृहमंत्रालयाने काढून टाकल्यानंतरसध्या काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे काश्मिरी जनतेच्या उज्वल भविष्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवण्याच्या तयारीत आहे.
  • काश्मीरमधल्या उभरत्या आणि तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी धोनीने आपल्या खांद्यावर घेतल्याचं समजतंय. आगामी काळात धोनी आपल्या या योजनेबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला माहिती देणार आहे. धोनी सध्या दक्षिण काश्मीर परिसरात आपल्या सैन्यदलातल्या तुकडीसोबत गस्त घालण्याचं काम करतोय. विश्वचषक संपल्यानंतर धोनीवर निवृत्तीचा दबाव वाढत होतामात्र धोनीने अद्याप अधिकृतरित्या आपल्या निवृत्तीची घोषणा केली नाहीये.

इस्रोच्या प्रमुखांचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान :
  • इस्रोचे प्रमुख के. सिवन यांचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सिवन यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानामुळे तामिळनाडू सरकारने हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. गुरूवारी त्यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने गौरवण्यात आले.
  • विज्ञान क्षेत्रातील प्रगतीतसेच मानवी आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने गौरवण्यात येते. तामिळनाडू सरकारच्यावतीने तामिळनाडूच्या रहिवासी असणाऱ्या व्यक्तींनाच हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सुवर्ण पदक आणि पाच लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

No comments