Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 18 June 2019

ब्रिटनमधील ‘तंत्रव्हिसा’त भारत, अमेरिकेची आघाडी:
इंग्लंडमधील डिजिटल तंत्रज्ञानविषयक उद्योजकांच्या समूहाने दिलेल्या माहितीनुसार, तेथील तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जास्तीत जास्त व्हिसा अर्ज करणाऱ्यांत भारतासह अमेरिकेचा वरचा क्रमांक लागत…

ब्रिटनमधील तंत्रव्हिसात भारत, अमेरिकेची आघाडी :
  • इंग्लंडमधील डिजिटल तंत्रज्ञानविषयक उद्योजकांच्या समूहाने दिलेल्या माहितीनुसार, तेथील तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जास्तीत जास्त व्हिसा अर्ज करणाऱ्यांत भारतासह अमेरिकेचा वरचा क्रमांक लागतो.
  • ब्रिटनच्या गृहविभागाची मान्यता असलेल्या टेक नेशनया संस्थेतर्फे तेथील तंत्रज्ञान क्षेत्रातील व्हिसा दिला जातो. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रासाठीच्या टेक नेशन प्रथम स्तरीय असाधारण प्रज्ञा व्हिसा वर्गवारीत २०१८-१९ मध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे. याआधीच्या वर्षांत या वर्गवारीसाठी ४५० अर्ज आले होते. ही संख्या आता ६५० वर गेली आहे. भारतातून व्हिसासाठी येणारे अर्ज हे विविध क्षेत्रांसाठी असतात, असे टेक नेशनने निदर्शनास आणले आहे.
  • तंत्रज्ञानविषयक व्हिसासाठी येणारे सर्वाधिक अर्ज हे यंदाही भारत आणि अमेरिकेतून आले आहेत. यात सॉफ्टवेअर अभियंते, या क्षेत्रातील उद्योक विकासक, एआय-मशीन लर्निग, फिनटेक-एन्टरप्राईज, क्लाऊड सेक्टर यांचा समावेश आहे.

एडीबी कढुन पाकला 3.4 अब्ज डॉलर्सचे कर्ज :
  • एशियन डेव्हलपमेंट बॅंकेकडून (एडीबी) पाकिस्तानला 3.4 अब्ज अमेरिकन डॉलरचे कर्ज मिळणार असल्याची माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सल्लागाराने दिली आहे. पाक सध्या प्रचंड रोखटंचाईला तोंड देत आहे.
  • त्याच बरोबर देणी वाढतच गेल्यास अर्थव्यवस्था कोसळण्याचे संकट उभे ठाकले आहे. बॅंकेशी करार झाल्यापासून वर्षभरात 2.1अब्ज दिले जातील.
  • पंतप्रधानांचे अर्थ सल्लागार डॉ. अब्दुल हाफीज शेख ट्विटरवर म्हणाले की, अर्थसंकल्पाला पाठिंबा म्हणून एडीबी पाकिस्तानला 3.4 अब्ज डॉलर्सचे कर्ज देणार आहे. आर्थिक वर्ष 2019-2020 च्या पहिल्या तिमाहीत 2.2 अब्ज डॉलर्स दिले जाईल.

ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष होणार :
  • भारतीय जनता पार्टीचे राजस्थानमधील कोटा येथील खासदार ओम बिर्ला हे लोकसभेच्या अध्यक्ष पदासाठी एनडीएचे उमेदवार राहणार असल्याची माहिती एएनआयने दिली आहे.
  • तसेच लोकसभा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह. रमापती राम त्रिपाठी, एसएस अहलुवालिया आणि डॉ. विरेंद्र कुमार यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते होते.
  • मात्र आज लोकसभा अध्यक्ष पदासाठी ओम बिर्ला हे उमेदवारी दाखल करणार आहेत. ज्यानंतर बुधवारी संसदेत यासाठी मतदान होईल. लोकसभेत एनडीए आघाडीचे बहुमत असल्याने ओम बिर्ला हेच लोकसभा अध्यक्ष होणार हे निश्चित आहे.

जगात अण्वस्त्रांच्या संख्येत गतवर्षी घट :
  • जगातील एकूण अण्वस्त्रांची संख्या गतवर्षांत कमी झाली आहे. असे असले तरी विविध देश त्यांच्या अण्वस्त्र साठय़ात आधुनिकता आणत आहेत असे एका अहवालात म्हटले आहे.
  • तर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेने म्हटले आहे की, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत व पाकिस्तान, इस्रायल, उत्तर कोरिया या देशांकडे एकूण 13,865 अण्वस्त्रे आहेत. याचा अर्थ अण्वस्त्र संख्या  2018 च्या तुलनेत सहाशेने कमी झाली आहे.
  • अण्वस्त्र संख्या कमी झाली असली तरी चीन, भारत, पाकिस्तान हे देश त्यांची अण्वस्त्रे आधुनिक करीत आहेत. या संस्थेच्या अण्वस्त्र नियंत्रण कार्यक्रमाचे संचालक श्नन किली यांनी सांगितले की, जगात अण्वस्त्रे कमी होत असली तरी त्यांचे स्वरूप बदलत आहे.
  • अमेरिका व रशिया यांच्याकडे जगातील नव्वद टक्के अण्वस्त्रे आहेत. त्यांनी अण्वस्त्रांची संख्या कमी केली आहे. नवीन स्टार्ट करारावर 2010 मध्ये अमेरिका व रशिया यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून त्यात सज्ज अण्वस्त्रांची संख्या कमी ठेवण्याचे बंधन आहे.

ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष होणार :
  • भारतीय जनता पार्टीचे राजस्थानमधील कोटा येथील खासदार ओम बिर्ला हे लोकसभेच्या अध्यक्ष पदासाठी एनडीएचे उमेदवार राहणार असल्याची माहिती एएनआयने दिली आहे.
  • तसेच लोकसभा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह. रमापती राम त्रिपाठी, एसएस अहलुवालिया आणि डॉ. विरेंद्र कुमार यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते होते.
  • मात्र आज लोकसभा अध्यक्ष पदासाठी ओम बिर्ला हे उमेदवारी दाखल करणार आहेत. ज्यानंतर बुधवारी संसदेत यासाठी मतदान होईल. लोकसभेत एनडीए आघाडीचे बहुमत असल्याने ओम बिर्ला हेच लोकसभा अध्यक्ष होणार हे निश्चित आहे.

No comments