Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 14 June 2019

बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी रघुराम राजन :
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची इंग्लंडच्या बँक ऑफ इंग्लंड या मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत राजन…

बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी रघुराम राजन :
  • रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची इंग्लंडच्या बँक ऑफ इंग्लंड या मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

  • बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत राजन यांचे नाव सर्वात पुढे आहे. ब्रेक्झिटमुळे इंग्लंडची अर्थव्यवस्था अडचणीत असताना मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरपदासाठी राजन यांच्या नावाचा विचार होणे, ही महत्त्वाची बाब आहे.

  • बँक ऑफ इंग्लंड 325 वर्षांपूर्वी स्थापन झालेली बँक असून, तिचे गव्हर्नरपद लवकरच रिक्त होणार आहे. अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम केलेले रघुराम राजन ब्रेक्झिटमधून निर्माण झालेल्या अडचणींतून मार्ग काढू शकतील, असे बोलले जात आहे.

  • तसेच रघुराम राजन सध्या शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक आहेत. राजन 2003 ते 2006 या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत मुख्य अर्थतज्ज्ञ होते.



बॅडमिंटन स्टार ली चोंगने जाहीर केली निवृत्ती :

  • कर्करोगाशी कडवी झुंज देत असलेला मलेशियाचा बॅडमिंटन स्टार ली चोंग वेई याने निवृत्ती जाहीर केली.

  • तर कारकीर्दीत अनेक जेतेपदाचा मानकरी राहिलेल्या 36 वर्षांच्या लीची आलिम्पिक सुवर्ण जिंकण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली.

  • प्राथमिक स्तरावर असलेल्या कर्करोगावर त्याने तैवानमध्ये उपचार करून घेतले. कोर्टवर पुनरागमनासाठी तो फारच उत्सुक होता.



स्वतःच्या अंतराळ स्थानक निर्मितीची भारताची योजना :

  • महत्वाकांक्षी चांद्रयान-2 चे काऊंडाऊन सुरु झाल्यानंतर अवकाश संशोधनामध्ये भारत आता भविष्यातही आणखी महत्वपूर्ण कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी अवकाशात स्वतःचे अंतराळ स्थानक निर्मितीचे नियोजन असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख डॉ. के. सिवन यांनी म्हटले आहे.

  • तर हा महत्वाकांक्षी प्रकल्प गगनयानमोहिमेचा पुढील भाग असेल असेही डॉ. सिवन यांनी स्पष्ट केले आहे.

  • अंतराळात माणूस पाठवण्याच्या मोहिमेनंतरही आपल्याला गगनयानकार्यक्रम टिकवून ठेवायचा आहे. त्यासाठीच भारत अवकाशात स्वतःचे अंतराळस्थानक निर्माण करण्याची तयारी करीत असल्याचे डॉ. सिवन यांनी सांगितले.

  • दरम्यान, आण्विक ऊर्जा आणि अंतराळ संशोधन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी नुकतेच म्हटले की, भारताने 2022 मध्ये आपल्या 75 व्या स्वातंत्र्यवर्षपूर्तीनिमित्त अंतराळात माणूस पाठवण्याच्या मोहिमेला सुरुवात केलेली असेल. यासाठी राष्ट्रीय सल्लागार परिषदेकडून तयारीही सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

  • त्याचबरोबर चांद्रायन-2 नंतर भारताने आता शुक्र आणि सुर्याच्या अभ्यासाचे लक्ष्य निश्चत केले आहे. भविष्यातील अंतराळ संशोधनातील विविध मोहिमांसाठी भारताला स्वतःचे अंतराळस्थानक असल्याचा मोठा फायदा होऊ शकतो. सध्या अंतराळात दोनच स्थानके आहेत एक आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक तर दुसरे चीनचे स्वतःचे अंतराळस्थानक आहे.



भारत-चीन-रशिया त्रिपक्षीय बैठक :

  • भारत, रशिया आणि चीन या देशांची त्रिपक्षीय बैठक या महिनाअखेरीस होणार आहे. जपानमध्ये होत असलेल्या जी-२०सदस्यदेशांच्या परिषदेच्या निमित्ताने ही बैठक होणार आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन हे सहभागी होतील, असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले.

  • किर्गिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेच्या निमित्ताने चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग तसेच  रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्याशी पंतप्रधान मोदी यांच्या स्वतंत्र भेटीगाठी झाल्या. त्या वेळी परस्पर संबंध अधिक दृढ करण्याचा निर्णय घेतला गेला. याच चर्चेतून त्रिपक्षीय बैठकीचा विचार पुढे आल्याचे समजते.

  • दहशतवादाच्या मुद्दय़ावर आणि विशेषत्वाने मसूद अझरप्रकरणी रशियाने नेहमीच भारताची पाठराखण केली आहे. चीनने मात्र आतापर्यंत नकाराधिकाराचा वापर करून भारताची कोंडी केली होती. या वेळी प्रथमच रशियाने चीनचे मन वळविण्याचा प्रयत्न केल्यानंतर चीनने मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास आडकाठी केलेली नाही.

  • सध्या अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारयुद्ध भडकत आहे. भारताच्याही अनेक र्निबधांबद्दल अमेरिकेने कठोर पवित्रा घेतला आहे. त्यामुळे भारत आणि चीनच्या संबंधांमधील सकारात्मक बदलांना महत्त्व आले आहे. आता त्रिपक्षीय बैठकीत दहशतवादविरोधी लढा तसेच आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या दिशेने चर्चा होण्याची शक्यता आहे.

No comments