Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 15 June 2019

‘जनगणना’ संकलन ऑनलाइन:
देशात सन २०२१मध्ये होणाऱ्या जनगणनेत माहितीचे संकलन प्रथमच ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. जनगणनेसाठी माहिती संकलनाच्या पद्धतीत क्रांतिकारक बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. यासाठीच्या सर्व टप्प्यांची चाचणी…

 ‘जनगणना’ संकलन ऑनलाइन  :
  • देशात सन २०२१मध्ये होणाऱ्या जनगणनेत माहितीचे संकलन प्रथमच ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. जनगणनेसाठी माहिती संकलनाच्या पद्धतीत क्रांतिकारक बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. यासाठीच्या सर्व टप्प्यांची चाचणी (रंगीत तालीम) ऑगस्ट ते सप्टेंबर, २०१९दरम्यान देशातील निवडक जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी भागांमध्ये होणार आहे.

  • भारताचे महानिबंधक तथा जनगणना आयुक्तांच्या कार्यालयामार्फत देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय कामाची म्हणजेच ‘जनगणना-२०२१’ची तयारी सुरू झाली आहे.



फोर्ब्सच्या यादीत 57 भारतीय कंपन्यांना स्थान; रिलायन्स 71 व्या क्रमांकावर :

  • जगभरातील 2000 मोठ्या कंपन्यांच्या यांदीत भारतातील 57 कंपन्यांना स्थान देण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला पहिल्या 200 कंपन्यांच्या यादीत स्थान देण्यात आले असून पहिल्या 200 कंपन्यांमध्ये ही एकमेव भारतीय कंपनी आहे. फोर्ब्सच्या नुकतीच एक यादी जाहीर केली आहे.

  • फोर्ब्सच्या जागतिक 2000 कंपन्यांच्या यावर्षीच्या यादीत चीनच्या इंडस्ट्रियल अँड कॉमर्शियल बँक ऑफ चायनाला (आयसीबीसी) पहिले स्थान देण्यात आले आहे. आयसीबीसी सलग सातव्यांदा फोर्ब्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या 200 कंपन्यांच्या यादीत रियालंस इंडस्ट्रीज या एकमेव कंपनीला या यादीत स्थान देण्यात आले आहे.

  • पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज 11 व्या स्थानावर आहे. तर रॉयल डच शेलला पहिले स्थान देण्यात आले आहे.

  • पहिल्या 2000 कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक 209 वे, ओएनजीसी 220 वे, इंडियन ऑईल 288 वे आणि एचडीएफसी लिमिटेड 332 वे स्थान देण्यात आले आहे.



साहित्य अकादमी पुरस्कार: कवी सुशीलकुमार शिंदे, सलीम मुल्ला यांचा गौरव

  • साहित्य अकादमीच्या युवा आणि बाल साहित्य पुरस्काराची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. मराठी भाषेसाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कवितासंग्रहाला यंदाचा युवा साहित्य पुरस्कार मिळाला असून सलीम मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या कादंबरीसाठी बालसाहित्य पुरस्कार देण्यात आला आहे.

  • साहित्य अकादमीने २२ भाषांमधील युवा साहित्यिकांच्या ११ काव्यसंग्रह, सहा कथा, पाच कांदबऱ्या आणि एका समीक्षेची पुरस्कारासाठी निवड केली. या वर्षी युवा साहित्यात कवितांचा अधिक प्रभावी ठरल्या. साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या कार्यकारी समितीने पुरस्कारांना संमती दिली. युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार पन्नास हजार रुपयांचा आहे. ३५ वर्षांच्या आतील साहित्यिकांसाठी युवा पुरस्कार दिला जातो. फक्त मैथिली भाषेतील पुरस्कार जाहीर झालेले नाहीत.



बिहार सरकारची वृद्धांसाठी नवी पेन्शन योजना :

  • बिहार सरकारने वृद्धांसाठी एका नव्या सार्वत्रिक पेन्शन योजनेची घोषणा केली आहे. ‘मुख्यमंत्री वृद्धजन पेन्शन योजना’ (एमव्हीपीवाय) असे या योजनेचे नाव आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शिवाय माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या वयोवृद्ध पत्रकारांना देखील पेन्शन दिले जाणार आहे.

  • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या योजनेची माहिती दिली. १ एप्रिल २०१९ पासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. शासकीय सेवानिवृत्त असलेल्या वयोवृद्धांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेअंतर्गत ६० वर्षांपेक्षा जास्त वय व पात्र असलेल्या सर्वांना मासिक ४०० रूपये पेन्शन तर ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्याना ५०० रूपये प्रति महिना दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • या योजनेची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, या योजनेसाठी राज्य सरकारने १८ हजार कोटी रूपयांचा विशेष निधी तयार केला आहे. आम्ही गरीब वृद्धांचा आदर व सन्मान करणार आहोत. आतापर्यंत जवळपास दोन लाख जणांनी या योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत, तर ३५ ते ३६ लाखांपर्यंत अर्जाचा आकडा जाईल अशी सरकारला अपेक्षा आहे.



केंद्रीय मंत्रिमंडळाला मोदींचे निर्देश – 9.30 पर्यंत कार्यालयात पोहोचा, घरातून काम करणे टाळा :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे मंत्र्यांच्या परिषदेला काही निर्देश दिले आहेत. त्या सूचना आहेत – वेळेवर कार्यान्वित व्हा आणि इतरांकरिता उदाहरण निर्माण करण्यासाठी घरून काम करणे टाळा. मंत्र्यांच्या परिषदेच्या पहिल्या बैठकीत ही सूचना जारी करण्यात आली. 
  • पंतप्रधानांनी वरिष्ठ मंत्र्यांना नवीन मंत्र्यांना मदत करण्यास सांगितले आणि प्रक्रिया समजून घेण्यासाठी त्यांना मदत केली. पंतप्रधान राज्य मंत्र्यांना अधिक शक्ती देण्यास तयार आहे कारण त्यांनी सांगितले की कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांच्याशी महत्वाची फाइल्स सामायिक केलीच पाहिजेत. अशाच पध्दतीने पंतप्रधान मोदी अधिक उत्पादनक्षमतेची अपेक्षा करीत आहेत.

No comments