Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 13 June 2019

भारताच्या मानवरहित स्क्रॅमजेट विमानाची चाचणी यशस्वी:

स्वदेशी बनावटीच्या मानवरहित स्क्रॅमजेट विमानाची चाचणी येथे यशस्वीरित्या घेण्यात आली असल्याचे बुधवारी संरक्षण सूत्रांनी सांगितले. या विमानाचा वेग अत्यधिस्वनी म्हणजे आवाजाच्या वेग…


भारताच्या मानवरहित स्क्रॅमजेट विमानाची चाचणी यशस्वी:

  • स्वदेशी बनावटीच्या मानवरहित स्क्रॅमजेट विमानाची चाचणी येथे यशस्वीरित्या घेण्यात आली असल्याचे बुधवारी संरक्षण सूत्रांनी सांगितले. या विमानाचा वेग अत्यधिस्वनी म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा जास्त आहे.

  • अत्यधिस्वनी क्रूझ क्षेपणास्त्राच्या निर्मितीचा महत्त्वाचा भाग म्हणून यातील तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने बंगालच्या उपसागरावरील डॉ. अब्दुल कलाम बेटांवरून सकाळी ११.२५ वाजता ही चाचणी केल्याचे सांगण्यात आले.

  • हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमनस्ट्रेटर व्हेइकल (एचएसटीडीव्ही) या विशेष प्रकल्पांतर्गत हे विमान विकसित करण्यात आले असून ते ध्वनीपेक्षा जास्त वेगाने जाते.

  • हे विमान वीस सेकंदात ३२.५ कि.मी म्हणजे वीस मैल उंची गाठते. त्याचा वेग ६ मॅकपर्यंत असतो. १५ ते २० कि.मी उंचीवर विमानाची कामगिरी कशी होते याची आधी चाचणी करण्यात आली. ते काम गेली दोन वर्षे सुरू होते.



पहिल्याच कॅबिनेट बैठकीत तीन तलाक विधेयकास मंजुरी:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आज तीन तलाक विधेयकास मंजुरी देण्यात आली. शिवाय मंत्रीमंडळाने जम्मू – काश्मीरमध्ये सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट वाढवण्यासही मंजुरी दिली आहे.

  • अध्यादेशाचं कायद्यात परिवर्तन करण्यासाठी विधेयक आणण्यात येणार आहे. शिवाय कॅबिनेटने ‘जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक २०१९’ ला मंजुरी दिली आहे. ज्यामुळे जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात राहणा-या नागरिकांना मदत होईल.

  • केंद्र सरकारने आधार आणि अन्य कायदे (संशोधन) विधेयक २०१९ ला ही मंजुरी दिली आहे.



 ऑस्ट्रेलियात धावणार ‘मेक इन इंडिया’ मेट्रो :

  • भारतातील उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ योजनेची सुरूवात केली होती. ‘मेक इन इंडिया’ योजनेला आता उत्तम प्रतिसाद मिळत असून ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये भारतात तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक मेट्रो धावणार आहेत. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.

  • गेल्या काही वर्षांमध्ये भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्यातच ‘मेक इन इंडिया’ या योजनेमुळे भारतातील उत्पादन क्षेत्रालाही मोठी चालना मिळाली आहे. देशांतर्गत आणि परदेशी कंपन्यांद्वारे देशातील उत्पादन क्षेत्राला चालना मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यातच आता या योजनेला मोठे यश मिळाले असून भारतात तयार करण्यात आलेली मेट्रो ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये धावणार आहे.

  • सिडनीत पहिल्यांदाच चालक विरहित मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या मेट्रोमध्ये 6 कोचेस देण्यात आले असून 22 अॅल्सटॉम ट्रेनद्वारे ही सेवा पुरवली जाणार आहे. तल्लावांग मेट्रो स्टेशन ते वेस्टवूड स्थानकादरम्यान ही मेट्रो सेवा चालवण्यात येईल.

  • तल्लावांग ते वेस्टवूडदरम्यान एकूण 13 मेट्रो स्थानके असतील. सिडनी मेट्रोसाठी ‘अॅल्सटॉम एसए’ या कंपनीने 22 मेट्रो ट्रेन तयार केल्या आहेत. या ट्रेन आंध्र प्रदेशात असेंबल करण्यात आल्या असून त्या पूर्णत: स्वयंचलित आहे. यामध्ये एलईडी लाइट, आपात्कालिन इंटरकॉम आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच ‘एल्सटॉम एसए’ने सिग्नलिंग सिस्टम आणि मेट्रो चालवण्यासाठी सिडनी मेट्रोसोबत 15 वर्षांचा करार केला आहे.

No comments