Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

15 जुलै रोजी भारताची चंद्रावरील दुसरी स्वारी!!

९७८ कोटींची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम; ‘चांद्रयान-२’चा कार्यक्रम जाहीर चंद्रावरील माती व वातावरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी भारताच्या ‘चांद्रयान-२’ या दुसऱ्या चांद्रमोहिमेसाठीचे यान १५ जुलै रोजी अंतराळात झेपावेल, असे इस्रोने बुध…

९७८ कोटींची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम; ‘चांद्रयान-२चा कार्यक्रम जाहीर
  • चंद्रावरील माती व वातावरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी भारताच्या चांद्रयान-२या दुसऱ्या चांद्रमोहिमेसाठीचे यान १५ जुलै रोजी अंतराळात झेपावेल, असे इस्रोने बुधवारी जाहीर केले. इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी सात आठवड्यांच्या महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमेची माहिती दिली.
  • चांद्रयान-२साठी जीएसएलव्ही-५ मार्क ३हा अग्निबाण श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ तळावरून १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी प्रक्षेपित केला जाईल. मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात वैज्ञानिक संशोधनासाठीची साधने व उपकरणे असलेले विक्रमहे लॅण्डर व प्रग्यानही गाडी (रोव्हर) ६ किंवा ७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविली जाईल.
  • दहा वर्षांपूर्वी भारताने चांद्रयान-१मोहीम पूर्ण केली होती. आताची मोहीम प्रगत व तंत्रसिद्धतेने अधिक आव्हानात्मक असेल.
  • चांद्रयान-१मध्ये चंद्रावर न उतरता ११ वैज्ञनिक उपकरणांनी चंद्राचा दुरुनच अभ्यास केला होता. आता प्रग्यानला कुशीत घेऊन विक्रमचंद्रावर उतरेल. नंतर प्रग्यानचंद्रावरील दगड-मातीचे नमुने गोळा करेल. दूरवरून अभ्यास करूनही चंद्रावरील पाण्याचा शोध लावणे हा चांद्रयान-१चा यशाचा तुरा ठरला होता. आता त्याच गृहितकास बळकटी मिळण्याखेरीज चंद्राची नवी गुपितेही उघड होतील.

शिवन म्हणाले की, चंद्राभोवती ऑर्बिटरने घिरट्या घालण्यापर्यंतचा टप्पा चांद्रयान-१प्रमाणे असेल. तेथपर्यंतचे मिशनयाआधी यशस्वी झाले होतेच. आताच्या मिशनमधील लॅण्डर व रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्याचा शेवटचा १५ मिनिटांचा टप्पा पूर्णपणे नवा असल्याने काहीशी धास्ती निर्माण करणारा असेल. पण इस्रोचे कुशल वैज्ञानिक ही नवखेपणाची बाजीही फत्ते करतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. या मोहिमेत १४ प्रकारची वैज्ञानिक उपकरणे यानासोबत पाठविली जातील. ती ऑर्बिटर’, ‘विक्रमहा लॅण्डर व प्रग्यानहा रोव्हर या तिन्हीवर विखुरलेली असतील व ती एकाच वेळी निरनिराळे प्रयोग-चाचण्या करत राहतील. - के. शिवन, अध्यक्ष, इस्रो

No comments