Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) झिम्बाब्वे या
देशाच्या माजी राष्ट्राध्यक्षाचे 6 सप्टेंबर 2019
रोजी निधन झाले. त्या व्यक्तीचे नाव काय होते?
A) एमर्सन मनांगग्वा
B) सिबुसीसो मोयो
C) कनान बनाना
D) रॉबर्ट मुगाबे
2) कोणत्या भारतीय राज्याने ‘सिस्टर स्टेट’ या संदर्भात संयुक्त राज्ये अमेरिकेच्या डेलावर
राज्याबरोबर एक सामंजस्य करार केला?
A) राजस्थान
B) गुजरात
C) पंजाब
D) आसाम
3) जागतिक आरोग्य संघटनेचे
मुख्यालय कुठे आहे?
A) वॉशिंग्टन डीसी, अमेरिका
B) लंडन, ब्रिटन
C) पॅरिस, फ्रान्स
D) जिनेव्हा, स्वित्झर्लंड
4) कोणता राज्य नवीन मोटर
वाहन नियमांना त्वरित लागू न करणार्या राज्यांपैकी एक नाही?
A) राजस्थान
B) महाराष्ट्र
C) मध्यप्रदेश
D) पंजाब
5) प्रोजेक्ट 75I अंतर्गत पारंपारिक पाणबुडी विकसित करण्यासाठी कोणत्या देशाने भारतापुढे
प्रस्ताव मांडला आहे?
A) इस्त्राएल
B) रशिया
C) अमेरिका
D) फ्रान्स
6) कोणत्या शहरात सहाव्या
भारत-चीन धोरणात्मक आर्थिक संवाद (SED)
या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले?
A) नवी दिल्ली
B) तियांजीन
C) शांघाय
D) हाँगकाँग
उत्तरे
1. (D) रॉबर्ट मुगाबे
आफ्रिकेतल्या झिम्बाब्वे या देशाचे
पदच्युत माजी राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांचे 6 सप्टेंबर 2019 रोजी निधन झाले. ते 95 वर्षांचे होते.
मुगाबे झिम्बाब्वेचे संस्थापक जनक आणि
मुक्तीवादाचे प्रतीक म्हणून ओळखले जात होते.
2. (B) गुजरात
दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी गुजरात राज्य सरकारने ‘सिस्टर स्टेट’ या संदर्भात संयुक्त राज्ये अमेरिकेच्या डेलावर राज्याबरोबर एक सामंजस्य करार
केला.
3. (D) जिनेव्हा, स्वित्झर्लंड
जागतिक आरोग्य
संघटना (WHO) ही आंतरराष्ट्रीय
सार्वजनिक आरोग्याशी संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संघटना आहे. दिनांक 7
एप्रिल 1948 रोजी स्थापना करण्यात आलेल्या WHOचे जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे मुख्यालय आहे. हा संयुक्त
राष्ट्रसंघ विकास गटाचा एक सदस्य आहे. ही आरोग्य संघटना पूर्वी ‘एजन्सी ऑफ द लीग ऑफ नेशन्स’ म्हणून ओळखली जात होती.
4. (B) महाराष्ट्र
रस्त्यावरील
अपघाती मृत्यू रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरामध्ये 1 सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा लागू केला आहे. नव्या
वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना अधिक दंड भरावा लागत आहे. त्यामुळे 5
सप्टेंबर 2019 रोजी पंजाब राज्याने नवीन मोटार वाहन नियम त्वरित लागू न
करण्याचा निर्णय घेतला. पंजाबसहित इतरही काही राज्यांनी असा निर्णय घेतला आहे,
ज्यात राजस्थान, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, तेलंगणा, ओडिशा आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे.
दिल्लीने देखील अद्याप नवे नियम अधिसूचित केले नाहीत.
5. (B) रशिया
रशिया या देशाने
भारतापुढे ‘प्रोजेक्ट 75I’ अंतर्गत सहा प्रगत पारंपरिक डिझेल-इलेक्ट्रिक
पाणबुड्यांचा विकास करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत रशियाने
आंतर-सरकारी कराराच्या (IGA) माध्यमातून
पारंपारिक पाणबुडीची संरचना संयुक्तपणे करण्याचा हा प्रस्ताव मांडला. भारतीय
नौदलाने प्रोजेक्ट 75I अंतर्गत 40,000
कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या सहा प्रगत
पारंपरिक डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडीसाठी निविदा काढली आहे.
6. (A) नवी दिल्ली
7 ते
9 सप्टेंबर या कालावधीत
नवी दिल्लीत सहाव्या भारत-चीन धोरणात्मक आर्थिक संवाद (SED) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
No comments