Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने 19 सप्टेंबर 2019 रोजी इंटरनेटची उपलब्धता हा शिक्षणाच्या मूलभूत हक्कांचा एक भाग असल्याचे घोषित केले?
A) महाराष्ट्र
B) कर्नाटक
C) केरळ
D) तामिळनाडू
2) सूर्याचा अभ्यास करणार्या प्रथम भारतीय अंतराळ मोहिमेचे नाव काय आहे?
A) विक्रम-L1
B) प्रज्ञान-L1
C) सनी-L1
D) आदित्य-L1
3) टोग्रोग किंवा तुगरिक हे _____ या देशाचे अधिकृत राष्ट्रीय चलन आहे.
A) बेलारूस
B) मंगोलिया
C) उझबेकिस्तान
D) ताजिकिस्तान
4) कोणत्या टॅक्सी-सेवा प्रदाता कंपनीने दिल्ली क्षेत्रातल्या त्याच्या वाहनचालकांना आयुषमान भारत आरोग्य योजनेच्या अंतर्गत आरोग्य सेवा लाभ प्रदान करण्यासाठी सामंजस्य करार केला?
A) उबर
B) झोमॅटो
C) ओला
D) गती
5) कोणत्या भारतीय मुष्टियोद्धाने जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला?
A) अमित पांघल
B) विजेंद्र सिंग
C) योगेश्वर दत्त
D) आर्फी लांबा
6) कोणत्या ठिकाणी पहिलेच असे अत्याधुनिक राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ (NPU) उभारले जाणार आहे?
A) मुंबई, महाराष्ट्र
B) गुवाहाटी, आसाम
C) ग्रेटर नोएडा, उत्तरप्रदेश
D) नवी दिल्ली
7) भारतातला कोणता प्रदेश “शोंडोल” या पारंपारिक नृत्यप्रकारासाठी प्रसिद्ध आहे?
A) आसाम
B) मणीपूर
C) लद्दाख
D) हिमाचल प्रदेश
उत्तरे
1. (C) केरळ
इंटरनेटची उपलब्धता हा घटनेच्या कलम 21 अन्वये शिक्षणाचा मूलभूत हक्क तसेच गोपनीयतेच्या अधिकाराचा भाग असल्याचा निर्णय 19 सप्टेंबर 2019 रोजी एका सुनावणीदरम्यान केरळ उच्च न्यायालयाने दिला.
2. (D) आदित्य-L1
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सन 2020 मध्ये सूर्य मोहीम अंतराळात प्रक्षेपित करणार आहे. या सूर्य मोहिमेचे नाव “आदित्य–एल1” (Aditya-L1) असे आहे.
3. (B) मंगोलिया
20 सप्टेंबर 2019 रोजी भारतीय राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खल्तमाजीन बटूल्गा यांनी नवी दिल्लीत भेट घेतली. मंगोलिया हा पूर्व आशियातला भूपरिवेष्ठित देश आहे. उलानबातर ही राजधानी असून टोग्रोग किंवा तुगरिक हे मंगोलियाचे अधिकृत राष्ट्रीय चलन आहे.
4. (C) ओला
ओला या टॅक्सी-सेवा प्रदाता कंपनीने दिल्ली क्षेत्रातल्या त्याच्या वाहनचालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दुय्यम आणि तृतीय आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी आयुषमान भारत-जन जन आरोग्य योजना (AB-PJAY) आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्यासोबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
5. (A) अमित पांघल
रशियामध्ये खेळल्या जात असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2018 या स्पर्धेमध्ये भारतीय मुष्टियोद्धा अमित पांघलने रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. 52 किलोग्रॅम वजनगटात अंतिम फेरीत त्याला शाखोबिदिन झोईरोव्हविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. पांघल हा एखाद्या जागतिक स्पर्धेत द्वितीय स्थान प्राप्त करणारा आजवरचा पहिलाच भारतीय मुष्टियोद्धा ठरला आहे.
6. (C) ग्रेटर नोएडा, उत्तरप्रदेश
उत्तरप्रदेश राज्याच्या ग्रेटर नोएडा येथे पहिलेच असे अत्याधुनिक राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ (NPU) उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याठिकाणी शिक्षण व कार्यप्रणालीच्या क्षेत्रात जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जाणार.
7. (C) लद्दाख
20 सप्टेंबर 2019 रोजी 408 लद्दाखीवासीयांनी 5 दिवसाच्या वार्षिक “नरोपा महोत्सव’च्या समारोपीय दिवशी “शोंडोल” नृत्य सादर करून नवा विश्वविक्रम रचला. शोंडोल नृत्य हे लद्दाखवासीयांचे पारंपारिक नृत्य आहे.
No comments