Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) कोणता दिवस भारतात हिंदी दिन साजरा केला जातो?
A) 14 ऑक्टोबर
B) 14 सप्टेंबर
C) 02 सप्टेंबर
D) 02 ऑक्टोबर
2) कोणत्या ठिकाणी 10 वी आशियाई प्रशांत युवा खेळ ही स्पर्धा खेळवली गेली?
A) झगरेब, क्रोएशिया
B) ल्युब्लजना, स्लोव्हेनिया
C) व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
D) व्लादिवोस्तोक, रशिया
3) 2019 या साली जागतिक प्रथमोपचार दिनाचा विषय कोणता होता?
A) फर्स्ट ऐड अँड रोड सेफ्टी
B) माय हेल्थ, माय राइट
C) फर्स्ट ऐड अँड एक्सक्लूडेड पीपल
D) गेटिंग टू झीरो
4) 13 सप्टेंबर 2019 रोजी केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे की काही उत्पादनांना वगळता कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी परवाना घेण्याची आवश्यकता नाही. वगळलेल्या यादीमध्ये कोणत्या उत्पादनाचा समावेश नाही?
A) तंबाखूपासून बनविलेली उत्पादने
B) संरक्षण उपकरणे
C) भांगपासून बनविलेली उत्पादने
D) औद्योगिक स्फोटके
5) 13 सप्टेंबर रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बदल करण्यात आलेल्या लघू वित्त बँकेसाठीच्या (SFB) किमान पेड-अप भांडवलाची आवश्यकता मर्यादा किती आहे?
A) रु. 2000 कोटी
B) रु. 1000 कोटी
C) रु. 200 कोटी
D) रु. 100 कोटी
6) भारतीय कंपनीद्वारे भारतात प्रथमच मेरीटाइम कम्युनिकेशन सर्विसेस कुठे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत?
A) पोरबंदर, गुजरात
B) कोची, केरळ
C) मुंबई, महाराष्ट्र
D) चेन्नई, तामिळनाडू
7) कोणत्या राज्य सरकारने इनोव्हेशन व्हिजन मोहिमेअंतर्गत 'जन सुचना पोर्टल'चा आरंभ केला?
A) गुजरात
B) राजस्थान
C) दिल्ली
D) महाराष्ट्र
उत्तरे 1. (B) 14 सप्टेंबर
हिंदी दिवस दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी हिंदी भाषेत कविता, निबंध लेखन इत्यादी स्पर्धा आयोजित केल्या जातात. या दिवसाचा मुख्य हेतू म्हणजे लोकांना त्यांच्या राष्ट्र आणि मातृभाषाबद्दल जागरूक करणे होय. 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदी भाषेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या दिवशी हिंदी भाषेला ‘राजभाषा’ बनविण्यात आले. राजभाषा हिंदी आणि लिपी देवनागरी राहणार असा एकमताने निर्णय घेण्यात आला.
2. (D) व्लादिवोस्तोक, रशिया
रशियाच्या व्लादिवोस्तोक येथे 10 वी आशियाई प्रशांत युवा खेळ ही स्पर्धा खेळवली गेली. भारताने सात वेगवेगळ्या प्रकारांमध्ये एकूण 16 सुवर्ण, 13 रौप्य व 5 कांस्यपदके जिंकले.
3. (C) फर्स्ट ऐड अँड एक्सक्लूडेड पीपल
दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसर्या शनिवारला जागतिक प्रथमोपचार दिन पाळला जातो. यंदा 14 सप्टेंबर 2019 रोजी "फर्स्ट ऐड अँड एक्सक्लूडेड पीपल" या विषयाखाली जागतिक प्रथमोपचार दिन साजरा करण्यात आला.
4. (C) भांगपासून बनविलेली उत्पादने
13 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे की तंबाखूचे उत्पादने, संरक्षण उपकरणे, घातक रसायने आणि औद्योगिक स्फोटके अश्या उत्पादनांना वगळता कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी परवाना घेण्याची आवश्यकता नाही.
5. (C) रु. 200 कोटी
13 सप्टेंबर रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी पेमेंट बँकांना लघू वित्त बँकेचा (SFB) परवाना मिळविण्यासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली आणि SFBसाठी किमान पेड-अप भांडवलाची आवश्यकता मर्यादा बदलून 200 कोटी रुपये (पूर्वीच्या 100 कोटींच्या ऐवजी) एवढी करण्यात आली आहे. लघू वित्त बँका मूलभूत बँकिंग सेवा पुरवितात.
6. (C) मुंबई, महाराष्ट्र
13 सप्टेंबर रोजी मुंबईत मेरीटाइम कम्युनिकेशन सर्विसेस (सागरी दळणवळण सेवा) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नेल्को कंपनीद्वारे या सेवा पुरविल्या जाणार आहेत. नेल्को कंपनी सागरी क्षेत्रासाठी दर्जेदार ब्रॉडबँड सेवा देणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. या सेवा सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा वापर करून जलप्रवास करताना सागरी क्षेत्रामध्ये लोकांना व्हॉईस, डेटा आणि व्हिडीओ सेवा देणार.
7. (B) राजस्थान
राजस्थान राज्य सरकारने सरकारी विभागांची माहिती त्वरित पोहोचण्यासाठी 'जन सुचना पोर्टल'चा आरंभ केला. 13 सप्टेंबर रोजी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जयपूरमध्ये राजस्थान इनोव्हेशन व्हिजन या अभियानांतर्गत हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.
No comments