यूएस ओपन 2019 (टेनिस): राफेल नदाल, बियांका आंद्रेस्कू विजेते
2019 यूएस ओपन (किंवा अमेरिकन ओपन) ही टेनिस स्पर्धा न्यूयॉर्क शहरात बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर येथे आऊटडोर हार्ड कोर्टवर नुकतीच खेळली गेली. ही या स्पर्धेची 139 वी आव…
- 2019 यूएस ओपन (किंवा अमेरिकन ओपन) ही टेनिस स्पर्धा न्यूयॉर्क शहरात बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर येथे आऊटडोर हार्ड कोर्टवर नुकतीच खेळली गेली. ही या स्पर्धेची 139 वी आवृत्ती होती आणि या वर्षाची चौथी आणि अंतिम ग्रँड स्लॅम स्पर्धा होती.
1) महिला एकेरी - बियांका आंद्रेस्कू (कॅनडा)
2) पुरुष एकेरी - राफेल नदाल (स्पेन)
3) महिला दुहेरी - एलिस मर्टेन्स (बल्गेरिया) व एरिना साबालेन्का (बेल्जियम)
4) पुरुष दुहेरी – जुआन सेबॅस्टियन कॅबल व रॉबर्ट फराह (कोलंबियाची जोडी)
5) मिश्र दुहेरी - बेथनी मॅटेक-सँड्स (अमेरिका) व जेमी मरे (ब्रिटन)
- स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविणारी बियांका आंद्रेस्कू कॅनडाची पहिलीच टेनिसपटू ठरली. तसेच, ग्रँड स्लॅम स्पर्धेत एकेरीचे जेतेपद पटकावणारी बियांका कॅनडाची पहिलीच टेनिसपटू ठरली.
- स्पेनच्या राफेल नदालचे हे 19 वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. त्याने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हला पराभूत केले. त्याने चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. सर्वाधिक 20 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविण्याचा विक्रम रॉजर फेडररने केला असून त्याची बरोबरी करण्यासाठी नदालला आणखी एका जेतेपदाची गरज आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. याआधी 1970 मध्ये केन रोजवालने वयाच्या 35 व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती.
गोव्याच्या प्रियव्रत पाटीलने रचला इतिहास; सोळाव्या वर्षी 'महापरीक्षा' उत्तीर्ण :
- दक्षिण गोव्यातील रिवण येथील 16 वर्षीय प्रियव्रत पाटीलने सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होत इतिहास रचला आहे. वयाच्या 16 व्या वर्षी प्रियव्रतने तेनाली परीक्षेच्या (महापरीक्षा) विविध 14 स्तरांमध्ये यश मिळवलं आणि सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं ट्विटरद्वारे अभिनंदन करत पाठ थोपटली आहे.
- तेनाली परीक्षेचे 14 स्तर असतात आणि वर्षातून दोन वेळा ही परीक्षा होते. जे विद्यार्थी शास्त्रांचं शिक्षण घेतात त्यांच्यासाठी ही परीक्षा महत्वपूर्ण असते. "प्रियव्रतने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं अभिनंदन. त्याने मिळवलेलं यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल", असं ट्वीट करत मोदींनी प्रियव्रतच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.
चंद्रावर पहिलं सॉफ्ट लँडिंग कधी झालं होतं :
- रशियाची अवकाश संस्था यूएसएसआरच्या लुना ९ मोहिमेत जानेवारी १९६६ मध्ये पहिल्यांदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आले. त्यावेळी पहिल्यांदा चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो मिळाला.
- १९५८ ते १९७९ या काळात फक्त अमेरिका आणि रशियाने चंद्र मोहिमा केल्या. या २१ वर्षात दोन्ही देशांनी ९० चंद्र मोहिमा केल्या.
राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धा - नेमबाज मेहुली घोषला दुहेरी विजेतेपद :
- पश्चिम बंगालच्या मेहुली घोष हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात वरिष्ठ आणि कनिष्ठ गटातही बाजी मारत राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
- अनहद जावंडा आणि पारुल कुमार यांनी अनुक्रमे पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात आणि ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराचे विजेतेपद मिळवले. डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंजवर झालेल्या या स्पर्धेत मेहुलीने महिलांच्या गटात निर्विवाद वर्चस्व गाजवले. तिने १० मीटर एअर रायफलमध्ये मध्य प्रदेशच्या श्रेया अगरवाल हिच्यावर मात करत २५२ गुणांनिशी विजेतेपद संपादन केले. श्रेयाला २५१.२ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली राजस्थानची अपूर्वी चंडेला २२९.३ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली.
- कनिष्ठ गटात, मेहूलीने पंजाबच्या खुशी सैनी हिचे आव्हान मोडीत काढत २५२.२ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. खुशीने २४८.८ गुणांसह रौप्यपदक प्राप्त केले. मध्य प्रदेशची मानसी कठैत २२७.५ गुणांसह तिसरी आली. अनहद याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात ऑलिम्पियन गुरप्रीत सिंग याला मागे टाकत सुवर्णपदक मिळवले. केरळचा थॉमस जॉर्ज तिसरा आला.
अंध लोकांच्या उपयोगासाठी नोटा आणि नाणी ओळखण्यासाठी RBI मोबाईल अॅप :
- अंध तसेच दृष्टिहीन लोकांना चलनातली नोटा आणि नाणी ओळखता यावीत म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) एक मोबाईल अॅप तयार करण्यात येत आहे.
- सध्या RBIने अनेक नवीन आकाराच्या नोटा आणि नाणी चलनात आणली आहेत मात्र ती ओळखण्यात अंध लोकांना समस्या उद्भवत आहेत. यावर उपाय म्हणून RBI कडून हे अॅप तयार केले जात आहे. अॅप तयार करण्यासाठी डॅफ्फोडील प्राय. लिमिटेड या तंत्रज्ञान संस्थेची निवड केली गेली.
- अंध व्यक्तींना चलनातील नव्या नोटा तसेच नाणे ओळखणे कठीण जात असल्याने नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड या संस्थेच्यावतीने उदय वारूंजीकर यांनी नवीन नोटा व नाणे ओळखता यावे यासाठी नोटांवर संकेत अथवा चिन्हे वापरण्याचे RBIला आदेश द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. त्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला अॅप बनवण्याचे आदेश दिले होते.
- भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सध्या 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या चलनी नोटा बाजारात आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून 1 रुपयांची नोटही प्रस्तुत करण्यात आली आहे. नोट कोणत्या रकमेची आहे, हे अंध व्यक्तींना ओळखता यावे यासाठी 100 रुपयांपासून पुढच्या रकमेच्या नोटा छापताना ठराविक खूणांचा वापर केलेला असतो, जेणेकरून अंध व्यक्तीला ती नोट ओळखता यावी. आता त्यासोबतच अॅप आणण्याचे RBIने ठरविले आहे.
✔मोबाईल कॅमेऱ्यांच्या माध्यमातून महात्मा गांधी यांचे छायाचित्र असलेल्या जुन्या आणि नव्या आकारातल्या नोटा कोणत्या रकमेच्या आहेत हे ओळखणार
✔वापरकर्त्याने तोंडाने संबंधित अॅपचे नाव उच्चारल्यावर ते उघडणार
✔मोबाईल कॅमेऱ्याच्या सहाय्याने बँकेची नोट स्कॅन केल्यावर दोन सेकंदाच्या आत ती नोट किती रुपयांची आहे हे अॅप सांगणार
✔अॅपने आवाजी स्वरुपात वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये वापरकर्त्याला माहिती देणार
No comments