Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) कोणत्या ई-कॉमर्स क्षेत्रातल्या उद्योगाने ऑगस्ट 2019 मध्ये भारतात मिलिटरी व्हेटेरन्स एम्प्लॉयमेंट प्रोग्राम नावाचा कार्यक्रम राबवविण्यास सुरुवात केली?
A) फ्लिपकार्ट इंडिया
B) अॅमेझॉन इंडिया
C) रिलायन्सफ्रेश
D) उबर इंडिया
2) ‘कम्युनिटी रेडियो संमेलन 2019’ हा कार्यक्रम कुठे आयोजित केला गेला?
A) नवी दिल्ली
B) मुंबई
C) चेन्नई
D) लद्दाख
3) भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण (ZSI) संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ‘मेसोव्हेलिया’ या कुटुंबातल्या अर्ध-जलचर किटकांच्या किती प्रजाती शोधून काढल्या?
A) पाच
B) सहा
C) सात
D) आठ
4) कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना "द किंग हमाद ऑर्डर ऑफ रेनेसेन्स" हा सन्मान देऊन गौरव केला?
A) संयुक्त अरब अमिरात
B) बहरीन
C) कतार
D) सौदी अरब
5) जीवनगौरव श्रेणीतला 2018 या वर्षासाठी तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार जिंकणारा व्यक्ती कोण आहे?
A) अपर्णा कुमार
B) प्रभात राजू कोळी
C) रामेश्वर जांग्रा
D) वांगचूक शेर्पा
उत्तरे
1. (B) अॅमेझॉन इंडिया
26 ऑगस्ट 2019 रोजी अॅमेझॉन इंडिया या ई-कॉमर्स कंपनीने भारतात मिलिटरी व्हेटेरन्स एम्प्लॉयमेंट प्रोग्राम नावाचा कार्यक्रम राबवविण्यास सुरुवात केली. जेष्ठ लष्करी सैनिक आणि त्यांचे साथीदार यांच्यासाठी कंपनीच्या देशभरातल्या केंद्रांमध्ये कामाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा कार्यक्रम चालवला जात आहे.
2. (A) नवी दिल्ली
27 ते 29 ऑगस्ट 2019 रोजी नवी दिल्लीत ‘कम्युनिटी रेडियो फॉर एसडीजीस’ या विषयाखाली 7 वे कम्युनिटी रेडियो संमेलन भरविण्यात आले.
3. (C) सात
भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण (ZSI) संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पाण्याच्या पृष्ठभागावर चालणार्या किंवा धावू शकणार्या ‘मेसोव्हेलिया’ या कुटुंबातल्या अर्ध-जलचर किटकांच्या सात नव्या प्रजाती शोधून काढल्या. त्यामध्ये अंदमान बेटांवर मेसोव्हेलिया अंदमाना, मेघालयात मेसोव्हेलिया बिस्पीनोसा आणि मेसोव्हेलिया इसियासी, तामिळनाडूत मेसोव्हेलिया ओक्युल्टा आणि मेसोव्हेलिया टेनुईया, तर मेघालय आणि तमिळनाडूमध्ये मेसोव्हेलिया ब्रेव्हिया आणि मेसोव्हेलिया डायलाताता या प्रजाती आहेत. देशभरात मेसोव्हेलिया या जातीच्या 12 प्रजाती आढळतात. हे किटक शिकारी म्हणून काम करतात.
4. (B) बहरीन
24 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहरीनच्या राजा हमाद बिन ईसा अल खलिफा यांनी "द किंग हमाद ऑर्डर ऑफ रेनेसेन्स" देऊन गौरवले. बहरीन हा फारसी आखाती प्रदेशातला एक बेटराष्ट्र आहे.
5. (D) वांगचूक शेर्पा
2018 या वर्षासाठी तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार दरवर्षी साहसी क्षेत्रात व्यक्तींच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारच्यावतीने दिला जातो. मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच लक्ष रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार विजेते – (जीवनगौरव) वांगचूक शेर्पा; (भू साहस) अपर्णा कुमार, दिवंगत दिपंकर घोष, मनिकंदन के.; (जल साहस) प्रभात राजू कोळी; (हवाई साहस) रामेश्वर जांग्रा.
No comments