Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 23 August 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे

1) भारताचे नवे कॅबिनेट सचिव कोण आहेत?
A) अजय कुमार
B) संजय मित्रा
C) राजीव गौबा
D) विशाल भारद्वाज

2) झांबिया प्रजासत्ताक या देशाचे वर्तमानातले राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?
A) रुपीया बांदा
B) मायकेल साता
C) एस्तेर लुंगु
D) एडगर चागवा लुंगु

3) _______ हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातला एक भूपरिवेष्ठित देश आहे. लुसाका हे त्याचे राजधानी शहर आहे.
A) झांबिया
B) अंगोला
C) नामिबीया
D) बोत्स्वाना

4) 21 ऑगस्ट रोजी मनुष्यबळ विकास मंत्रीने सर्वात मोठ्या शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ केला. त्या कार्यक्रमाचे नाव काय आहे?
A) विद्या
B) निष्ठा
C) ज्ञान
D) सरल

5) अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या स्टेट रूफटॉप सोलर अट्रॅक्टीवनेस इंडेक्स (सरल’) यामध्ये कोणत्या राज्याला प्रथम स्थान प्राप्त झाले?
A) तेलंगणा
B) गुजरात
C) आंध्रप्रदेश
D) कर्नाटक

6) भारत सरकारच्या नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने 2022 सालापर्यंत ________ एवढ्या अक्षय ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य निश्चित केले आहे.
A) 375 गीगावॉट
B) 275 गीगावॉट
C) 175 गीगावॉट
D) 75 गीगावॉट

7) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) वर्तमानातले व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
A) क्रिस्टलिना जॉर्जिवा
B) क्रिस्टीन लागार्डे
C) गीता गोपीनाथ
D) हॅरी डेक्सटर व्हाइट

उत्तरे 
1. (C) राजीव गौबा
कॅबिनेट नियुक्ती समितीने राजीव गौबा ह्यांची कॅबिनेट सचिव पदावर नियुक्ती केली. ही नियुक्ती 30 ऑगस्ट 2019 पासून दोन वर्षांच्या कार्यकाळापर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत किंवा जे आधी येणार तिथपर्यंत करण्यात आली आहे.

2. (D) एडगर चागवा लुंगु
झांबियाचे राष्ट्राध्यक्ष एडगर चागवा लुंगु यांनी 20 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2019 या काळात भारताला भेट दिली. नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर भारत दौऱ्यावर आलेले ते आफ्रिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत. राष्ट्राध्यक्ष लुंगु यांचा हा पहिलाच भारत दौरा होता.
  
3. (A) झांबिया
झांबिया हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातला एक भूपरिवेष्ठित देश आहे. त्याला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताकटांझानियामलावीमोझांबिकझिंबाब्वेबोत्स्वाना व नामिबिया आणि अँगोला या देशांचा वेढा आहे. लुसाका ही झांबियाची राजधानी असून झांबियाई क्वाचा हे राष्ट्रीय चलन आहे.

4. (B) निष्ठा
प्राथमिक स्तरावरच्या शिक्षणाची फलश्रुती सुधारण्यासाठीच्या राष्ट्रीय मोहीम निष्ठा’ चा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी 21 ऑगस्ट रोजी प्रारंभ केला. या कार्यक्रमादरम्यान नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेडस्‌ ॲण्ड टिचर्स होलिस्टिक ॲडव्हान्समेंट’ अर्थात निष्ठाचे संकेतस्थळप्रशिक्षण मोड्युलमोबाईल ॲपचेही त्यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. शिक्षकांना प्रशिक्षण देणारा अशा प्रकारचा हा जगातला सर्वात मोठा प्रशिक्षण कार्यक्रम ठरणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा जागृत करण्याच्या दृष्टीने शिक्षकांना प्रोत्साहन देणे हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. कल आधारित शिक्षणपाल्य केंद्रीत अध्यापनयोगग्रंथालयनेतृत्व गुण शिक्षकांमध्ये विकसित करण्याचे या कार्यक्रमाचे उदिृष्‍ट आहे. या कार्यक्रमाद्वारे 42 लक्ष शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे ध्येय आहे.

5. (D) कर्नाटक
केंद्रीय ऊर्जा व नवीन व अक्षय ऊर्जा राज्यमंत्री के. सिंह यांनी स्टेट रूफटॉप सोलर अट्रॅक्टीवनेस इंडेक्स (सरल’) प्रसिद्ध केला. त्यामध्ये प्रथम क्रमांक कर्नाटक राज्याने पटकावला आहे. त्याच्यापाठोपाठ तेलंगणागुजरात आणि आंध्रप्रदेश यांचा क्रम लागला आहे.

6. (C) 175 गीगावॉट
भारत सरकारच्या नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने 2022 सालापर्यंत 175 गिगावॉट एवढ्या अक्षय ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यापैकी 100 गीगावॅट सौर ऊर्जा मार्च 2022 पर्यंत कार्यरत होईलज्यापैकी 40 गीगावॅट ऊर्जा ग्रीडशी जोडलेल्या छतावरील सोलर प्रकल्पांपासून मिळणार.

7. (B) क्रिस्टीन लागार्डे
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) मंडळाने क्रिस्टलिना जॉर्जिवा (बल्गेरिया) यांच्यासाठी व्यवस्थापकीय संचालक पदासाठीची वयोमर्यादा रद्द करण्यासाठी शिफारस केली आहे. वर्तमानातले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टीन लागार्डे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्या 12 सप्टेंबर 2019 पर्यंत पदावर आहेत. 66 वर्षीय क्रिस्टलिना जॉर्जिवा यांचे वय संस्थेनी ठरविलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक असल्याने हा पुढाकार घेण्यात आला.

No comments