Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे
1) कोणत्या खेळाडूने ATP सिनसिनाटी मास्टर्स 2019 ही टेनिस क्रिडास्पर्धा जिंकण्यासाठी डेव्हिड गॉफिनला पराभूत केले?
A) नोव्हाक जोकोव्हिच
B) डॅनिल मेदवेदेव
C) रॉजर फेडरर
D) अँडी मरे
2) मोहम्मद अनास कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
A) धाव शर्यत
B) मुष्टियुद्ध
C) कुस्ती
D) टेनिस
3) ऑगस्ट महिन्यात निधन झालेल्या प्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखकाचे नाव ओळखा.
A) एस. के. मिश्रा
B) नटवर दिवान
C) रणजित गुरू
D) श्याम दिक्षित
4) मध्य भुटानच्या ट्रोंगासा झोंगखाग जिल्ह्यातल्या मांगदेछू जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केले?
A) नरेंद्र मोदी
B) राजनाथ सिंग
C) राम नाथ कोविंद
D) एस. जयशंकर
5) 17 ऑगस्ट 2019 रोजी निधन झालेल्या पद्मश्री प्राप्तकर्ता प्रख्यात समाजसेवकाचे नाव काय होते?
A) सदाशिव कटरे
B) देवी शंकर प्रसाद
C) कमल बजाज
D) दामोदर गणेश बापट
6) ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या माजी गोलंदाजांना मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) याचे मानद आजीवन सभासदत्व बहाल केले गेले?
A) शेन वॉर्न
B) नॅथन लियोन
C) मिशेल जॉन्सन
D) मिशेल स्टार्क
उत्तरे
1. (B) डॅनिल मेदवेदेव
रशियाच्या डॅनिल मेदवेदेव ह्याने ATP सिनसिनाटी मास्टर्स 2019 या टेनिस क्रिडास्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकाराचे विजेतेपद पटकावले. त्याने अंतिम सामन्यात डेव्हिड गॉफिनचा पराभव केला. हे त्याचे पहिलेच मास्टर्स 1000 जेतेपद आहे.
2. (A) धाव शर्यत
झेक प्रजासत्ताक या देशात सुरु असलेल्या मिटींक रीटर अॅथलेटिक्स स्पर्धेत 300 मीटर शर्यतीत भारताचे धावपटू हिमा दास व मोहम्मद अनास यांनी वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले आहे. झेक प्रजासत्ताकमधील अॅथलेटिक मिटिंक रीटर टूर्नामेंटमध्ये अव्वल भारतीय स्पिंटर्स हिमा दास आणि मोहम्मद अनस यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकले. हिमाने महिलांच्या 300 मी गटात अव्वल स्थान मिळविले, तर पुरुषांनी 300 मीटरमध्ये अनास अव्वल स्थान मिळविले.
3. (C) रणजित गुरू
ओडिशा राज्याचे प्रसिद्ध पत्रकार रणजित गुरू यांचे 18 ऑगस्ट 2019 रोजी निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. त्यांना पत्रकारितेचा तीन दशकांहून अधिक काळाचा अनुभव होता.
4. (A) नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुटानमध्ये उभारण्यात आलेल्या 10 हजार मेगावॉट क्षमतेच्या मांगदेछू जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. 4500 कोटी रूपयांचा हा जलविद्युत प्रकल्प मध्य भुटानच्या ट्रोंगासा झोंगखाग जिल्ह्यात मांगदेछू नदीवर बांधण्यात आला आहे. प्रारंभी 720 मेगावॉटच्या क्षमतेसह प्रकल्प चालवला जाणार आहे. 2020 सालापर्यंत प्रकल्पाची पूर्ण क्षमता प्राप्त करण्याची योजना आहे.
5. (D) दामोदर गणेश बापट
17 ऑगस्ट 2019 रोजी छत्तीसगडचे प्रख्यात समाजसेवक आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्तकर्ता दामोदर गणेश बापट यांचे निधन झाले. कुष्ठरोग्यांच्या सेवेत त्यांनी आपले जीवन घालवले. ते 84 वर्षांचे होते. बापट छत्तीसगडमधल्या आश्रमात काम करत होते. त्यांना 2018 साली पद्मश्री हा भारत सरकारचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.
6. (C) मिशेल जॉन्सन
ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाज मिशेल जॉन्सन यांना मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) याचे मानद आजीवन सभासदत्व बहाल केले गेले. ऑस्ट्रेलियाकडून जॉन्सनने 73 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेत आणि 313 बळी त्यांच्या नावावर आहे.
No comments