Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 19 July 2019

‘गॉड ऑफ क्रिकेट’ला ‘हॉल ऑफ फेम’चा सन्मान : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा औपचारिकरीत्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला. क्रिकेट जगतातील हा एक प्रतिष्ठ…


गॉड ऑफ क्रिकेटला हॉल ऑफ फेमचा सन्मान :
  • क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा औपचारिकरीत्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानाच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. क्रिकेट जगतातील हा एक प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान आहे. Hall of Fame या मानाच्या यादीत स्थान पटकवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन ५ वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे सचिनच्या आधी कुंबळे आणि राहुल द्रविडचा हॉल ऑफ फेममध्ये सहभाग झाला होता.
  • सचिनसह दक्षिण अफ्रिकाचे माजी वेगवान गोलंदाज ऍलन डोनाल्डऑस्ट्रेलियाच्या माजी महिला वेगवान गोलंदाज कॅथरीनसह तीन जणांना गुरूवार आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. हॉल ऑफ फेम मध्ये स्थान मिळालेला सचिन सहावा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी बिशन सिंह बेदीकपिल देवसुनील गावस्करअनिल कुंबळे आणि राहुल द्रविड यांना सहभागी केले होते.
  • सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक २०० कसोटी सामने४६३ एकदिवसीय सामनेकसोटी क्रिकेटमध्ये १५ हजाराहून अधिक धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८ हजाराहून अधिक धावांबरोबरच इतरही अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

सुप्रीम कोर्टाचे निकाल मराठीसह सात प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार :
  • सर्वोच्च न्यायालयाची निवडक निकालपत्रे मराठीसह सात प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्याची सोय सुरू झाली आहे. तसेच न्यायालयाच्या वेबसाइटवर यासाठी व्हर्नॅक्युलर जजमेंट्स’ असा स्वतंत्र शोधसंकेतक सुरू करण्यात आला आहे.
  • तर केरळ उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात राष्ट्रपतींनी केलेल्या सूचनेनुसारच ही भाषांतर सेवा सुरू केली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर गुरुवारी पहिल्या दिवशी हिंदीतमिळकन्नडतेलगूबंगालीआसामी व मराठीत भाषांतरित केलेली एकूण 113 निकालपत्रे प्रसिद्ध केली गेली. त्यापैकी 14 मराठीत आहेत.

दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्याबाबत समिती सकारात्मक :
  • इयत्ता दहावीला भाषा आणि समाजशास्त्र विषयासाठी अंतर्गत गुण पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीचा प्राथमिक स्तरावर सकारात्मक प्रतिसाद आहे. या संदर्भात आणखी एक बैठक घेऊन अंतिम निर्णय होणार आहे.
  • राज्य मंडळाने गेल्या वर्षी गणित आणि विज्ञान वगळता अन्य विषयांसाठीचे अंतर्गत गुण बंद केले. त्याचा परिणाम म्हणजे दहावीचा निकाल १२.३१ टक्क्य़ांनी घटला. अंतर्गत गुण बंद केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनाही फटका बसला.
  • राज्यातील ९० ते ९५ टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटली. तसेच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत नामांकित महाविद्यालयात राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांपेक्षा सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळण्याच्या चर्चेने पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यानंतर अंतर्गत गुण पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
  • त्यानुसार शिक्षण विभागाने अन्य मंडळांच्या मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करून राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेतील मूल्यमापनासंदर्भात समिती नेमली. या समितीला दहा दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. समितीने पालकशिक्षकशिक्षणतज्ज्ञ या सर्वाकडून सूचना मागवल्या.

श्रीमंतांच्या यादीत अरनॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर :
  • गत सात वर्षांपासून जगातील सर्वात श्रीमंत म्हणून बहुमान मिळविलेले तसेच या यादीत नंबर 2 पेक्षा कधीही खाली न आलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (अमेरिका) यांना यंदा दिग्गजांनी मागे टाकले आहे. त्यामुळे बिल गेट्स श्रीमंतांच्या यादीत तिसर्या क्रमांकावर गेले आहेत.
  • ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट हे दुसर्या क्रमांकावर पोहोचले आहेत. तरश्रीमंतांच्या यादीत क्रमांक एकवर अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस (अमेरिका) यांचे वर्चस्व कायम आहे. तसेच बर्नार्ड अरनॉल्ट हे फ्रान्समधील लग्झरी गुड्स कंपनी एलव्हीएमएचचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत. 70 वर्षीय अरनॉल्ट यांची कंपनी फ्रान्समधील चर्चित कंपनी आहे.

संगणकाच्या मदतीने रूबिक क्युबचे कोडे सोडवण्यात यश :
  • दिवसेंदिवस कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र विस्तारत असताना आता वैज्ञानिकांनी रूबिक क्युबचे तर्कावर आधारित कोडे सोडवण्यासाठी अलगॉरिथम विकसित केले आहे. सेकंदापेक्षाही कमी काळात हे कोडे संगणकाच्या मदतीने सोडवण्यात यश आले आहे.तसेच माणसाकडून कुठलेही प्रशिक्षण नसताना यंत्राच्या मदतीने हे कोडे सोडवता येते हे स्पष्ट झाले आहे.
  • हंगेरीच्या स्थापत्यशास्त्रज्ञाने 1974 मध्ये रूबिक क्यूबचा शोध लावला होता. हे कोडे सोडवताना अनेकांना जड जाते. डीपक्युब ए या अलगॉरिथमच्या मदतीने हे कोडे सोडवण्यात यश आले असून कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी अलगॉरिथम तयार केला आहे. सेकंदापेक्षाही कमी काळात हे कोडे त्याच्या मदतीने सोडवण्यात आले.

No comments