Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 18 July 2019

चुकीचा आधार नंबर दिल्यास दहा हजारांचा दंड : सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये किंवा इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना आधार कार्ड नंबर चुकीचा नोंदवल्यास अथवा नोंदवताना चूक झाल्यास दहा हजारांचा दंड बसणार आहे. सरकार लवकरच ‘इन्कम टॅक्स ऍक्ट’शी सं…

चुकीचा आधार नंबर दिल्यास दहा हजारांचा दंड :
  • सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये किंवा इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना आधार कार्ड नंबर चुकीचा नोंदवल्यास अथवा नोंदवताना चूक झाल्यास दहा हजारांचा दंड बसणार आहे. सरकार लवकरच इन्कम टॅक्स ऍक्टशी संबंधित नियमावलीत बदल करणार आहे. त्यानुसार चुकीचा आधार नंबर नोंदवणाऱ्याकडून दहा हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे.
  • इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार नंबर चालू शकणार आहेही महत्त्वाची घोषणा दुसऱ्या टर्मचा पहिल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने केली होती. तर त्यामुळे सरकारी कागदपत्रावर किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आधार नंबर टाकाताना सावधानता बाळगा.
  • चुकीचा आधार नंबर टाकल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. इन्कम टॅक्स ऍक्टच्या कलम 272 नुसार हा बदल केला जाणार आहे. हा नवीन नियम एक सप्टेंबर 2019 पासून लागू होण्याची शक्यता आहे.


येत्या २१ किंवा २२ जुलैला चांद्रयान-२ झेपावणार अवकाशात :
  • तीन दिवसांपूर्वीच तांत्रिक बिघाडामुळे इस्त्रोला चांद्रयान-२ चे उड्डाण रद्द करावे लागले होते. आता येत्या २१ किंवा २२ जुलैला चांद्रयान-२ अवकाशात झेपावू शकते. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो या दोन तारखांवर विचार करत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. १५ जुलैला सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होते. पण क्रायोजेनिक इंजिनमधील हेलियम गॅस बॉटलच्या निप्पल जॉईंटमधून गळती झाली. त्यामुळे ५६ मिनिटे आधीच उड्डाण रद्द करण्यात आले.
  • २१ जुलैला रविवारी दुपारी किंवा २२ जुलैची मध्यरात्रीची वेळ उड्डाणासाठी ठरवली जाऊ शकते. इस्त्रोने अद्याप प्रक्षेपणाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. GSLV MK 3 प्रक्षेपकाच्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये ही तांत्रिक अडचण नेमकी कुठे निर्माण झाली होती. ते इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे. क्रायोजेनिक इंजिनमधील हेलियम गॅस बॉटलच्या निप्पल जॉईंटमधून गळती झाली. निप्पल जॉईंटमधल्या गळतीमुळे हेलियम गॅस बॉटल पुरेसा दबाव निर्माण करु शकली नाही.
  • इंधन आणि ऑक्सिडायझर दबाव निर्माण करण्यासाठी हेलियम गॅस बॉटलचा वापर केला जातो. चांगली बाब म्हणजे गळती दुरुस्त करण्यासाठी संपूर्ण रॉकेट खोलण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे जुलै महिन्यातच पुन्हा चांद्रयान-२ चे अवकाशात झेपावण्याची शक्यता आहे असे एका वरिष्ठ वैज्ञानिकाने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले. हे नेमकं कशामुळे घडलं ते समजत नाही तो पर्यंत धोका कायम आहे. दुरुस्ती करणे शक्य आहे पण गळती कशी झाली ते समजलं नाही तर पुन्हा ही समस्या उदभवण्याची शक्यता आहे.

हिमाची आणखी एक सुवर्ण कामगिरी :
  • भारतीय वेगवान धावपटू हिमा दासची दमदार कामगिरी सुरूच आहे. सलग 15 दिवसांच्या आत हिमाने धावण्याच्या विविध स्पर्धांमध्ये चौथे सुवर्णपदक जिंकत आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
  • झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या टॅबर ऍथलेटिक्स मीटवर हिमा दास ने हा पराक्रम केला आहे. तसेच पुरुषांच्या 400 मीटर स्पर्धेत मोहम्मद अनसने आपले दुसरे सुवर्ण पदक मिळवले आहे. हिमा ने केवळ 23.25 सेकंदात 200 मीटर अंतर पार करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. याआधी 19 वर्षांच्या हिमाने 2,6 आणि 14 जुलै रोजीही तीन सुवर्णपदक जिंकले होते.

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती :
  • कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात बुधवारी भारताला मोठे यश मिळाले. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावीअसे निर्देश न्यायालयाने पाकिस्तानला दिले.
  • भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याचे भारतात तीव्र पडसाद उमटले. भारताने या निर्णयाविरोधात ८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.
  • आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्या. अब्दुलक्वी अहमद युसूफ यांच्या अध्यक्षतेखालील १६ सदस्यीय पीठाने या प्रकरणात भारत आणि पाकिस्तान यांची बाजू ऐकून घेऊन २१ फेब्रुवारी २०१९ रोजी निर्णय राखून ठेवला होता. अखेर दोन वर्षे आणि दोन महिने चाललेल्या या खटल्यात न्यायालयाने बुधवारी भारताच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा फेरविचार करण्याचे निर्देश पाकिस्तानला देतानाच न्यायालयाने व्हिएन्ना कराराच्या उल्लंघनाबाबतचा भारताचा मुद्दाही ग्राह्य़ धरला.

No comments