Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 17 June 2019

जगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटरची भारतात एन्ट्री : आर्टिफिशिअल इंटेलिजंसमध्ये जगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटर डीजीएक्स-2 भारतात आला आहे. या कॉम्प्युटरला जोधपूर आयआयटीमध्ये ठेवण्यात आले आहे. या कॉम्प्युटरमुळे देशातील …

जगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटरची भारतात एन्ट्री :
  • आर्टिफिशिअल इंटेलिजंसमध्ये जगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटर डीजीएक्स-2 भारतात आला आहे. या कॉम्प्युटरला जोधपूर आयआयटीमध्ये ठेवण्यात आले आहे. या कॉम्प्युटरमुळे देशातील विद्यार्थ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण देण्यास गती मिळणार आहे.
  • आयआयटी जोधपूरचे कॉम्प्युटर सायन्स विभागाचे अध्यक्ष डॉ. गौरव हरित यांनी सांगितले की, हा जगातील सर्वात वेगवान आर्टिफिशिअल इंटेलिजंस अॅप्लिकेशन्स कॉम्प्युटर असून भारतात पहिल्यांदाच आला आहे. हा कॉम्प्युटर विशेष प्रयोगशाळेमध्ये बसविण्यात आला आहे.
  • तसेच या कॉम्प्युटरची किंमतही खूप आहे. या कॉम्प्युटरसाठी तब्बल 2.5 कोटी रुपये मोजण्यात आले आहेत. यामध्ये 16 खास जीपीयू लावण्यात आले आहेत. या प्रत्येक कार्डची क्षमता 32 जीबी एवढी आहे. तर रॅम 512 जीबीची देण्यात
  • आली आहे. साधारण कॉम्प्युटरची क्षमता केवळ 150 ते 200 वॅट असते. मात्र, या सुपरकॉम्प्युटरची क्षमता 10 किलोवॅट आहे. प्रत्येक कॉम्प्युटर प्रोग्रॅम डेटा विश्लेषण आधारावर असते. आणि हे विश्लेषण सुपरकॉम्प्युटर वेगात करणार आहे. यामध्ये लावलेल्या 32 जीबीची 16 जीपीयू कार्ड या कॉम्प्युटरला खास बनवितात. यामुळे कामाचा वेग वाढला आहे.
  • देशात सध्या आयआयएससी बंगळुरुसह काही संस्थांमध्ये डीजीएक्स-1 सुपरकॉम्प्युटर आहेत. मात्र, डीजीएक्स-2 सुपरकॉम्प्युटर पहिल्यांदाच देशात आला आहे. डीजीएक्स-1 पेक्षा हा कॉम्प्युटर दुप्पट क्षमतेने जास्त आहे. डीजीएक्स-1 ला एखादे काम करण्यासाठी 15 दिवस लागत असतील तर डीजीएक्स-2 ला दीड दिवस लागतात. या कॉम्प्युटरचे वजन तब्बल 150 किलो आहे तर साठवण क्षमता 30 टीबी आहे.
  • डीजीएक्स-2 हा सुपर कॉम्प्युटर अमेरिकेच्या एनव्हिडीया या कंपनीने बनविला आहे. आयआयटी जोधपूर आणि या कंपनीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजंस क्षेत्रासाठी दोन वर्षांचा करार झाला आहे. या करारानुसारच कॉम्प्युटर भारतात आणण्यात आला आहे.

मेट्रोसाठी आता देशभरात वन मेट्रो वन कार्ड’ :
  • मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. देशातील सर्वच मेट्रोंमध्ये प्रवास करता येण्यासारखे वन मेट्रो वन कार्डकेंद्र सरकार सुरू करण्याच्या तयारीत आहे. तर दरम्यान, मेट्रोच्या ठराविकच फेऱ्यांसाठी या कार्डाचा उपयोग करता येणार आहे. तसेच अन्य राज्यांमध्ये या कार्डचा वापर करायचा असल्यास कार्ड केवळ काऊंटरवर नेऊन ते रिचार्ज करावे लागणार आहे.
  • तसेच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने वन नेशन वन कार्डयोजना लाँच केली होती. या कार्डच्या माध्यमातून कोणत्याही राज्यांमध्ये परिवहन सुविधेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, या सेवेचा लाभ घेण्यासाठी केवायसीप्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल. तसेच यासाठी बँकांची मदत घेता येणार आहे. हे मेट्रो कार्ड क्रेडिट आणि डेबिट कार्ड प्रमाणेच असेल.
  • तर पुढील सहा महिन्यांमध्ये हे कार्ड लाँच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतात फिरण्यासाठी किंवा कमी कालावधीसाठी वास्तव्यास येणाऱ्या लोकांना या कार्डाचा लाभ घेता येणार नसल्याची माहिती दिली. तसेच केवायसीप्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय हे कार्डही देण्यात येणार नाही. अशा लोकांसाठी पर्यायी कार्डाचा विचार सुरू असून त्यासाठी पासपोर्ट किंवा आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात १५-२० नव्या घोषणा :
  • राज्य सरकारचा अर्थसंकल्प मंगळवारी १८ जून रोजी मांडला जात असून विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विविध समाजगटांना आपलेसे करण्यासाठी १५ ते २० नव्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
  • लोकसभा निवडणुका असल्याने फेब्रुवारीतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात संपूर्ण अर्थसंकल्प मांडण्यात आला नव्हता. तरीही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्या लेखानुदानाचे रूपांतर छोटय़ा अर्थसंकल्पातच करत अनेक घोषणा केल्या होत्या. रविवारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात धनगर समाजाला मोठा दिलासा देण्यात येईल, असे सूतोवाच केले. पण तपशील सांगण्यास नकार दिला. त्यानंतर याबाबत अधिक माहिती घेतली असता, धनगर समाजाबरोबरच राज्यातील छोटे-मोठे विविध समाजघटक डोळ्यांसमोर ठेवून १५ २० नवीन घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
  • लोकसभा निवडणुकीत विविध समाजघटकांनी काही मुद्दे सत्ताधाऱ्यांसमोर मांडले. त्या अनुभवाच्या आधारे आता विधानसभा निवडणुकांत लोकप्रिय ठरतील अशा नव्या घोषणा करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

एलिफंटाच्या सुरक्षिततेसाठी उभारणार संरक्षण भिंत :
  • जेएनपीटीच्या भरावामुळे जागतिक कीर्तीच्या एलिफंटा बेटाच्या किनाऱ्याची झालेली प्रचंड धूप थांबविण्यासाठी जेएनपीटीने एलिफंटा बेटाच्या सभोवार सुमारे चार कि.मी. लांबीची संरक्षक भिंत उभारणीची योजना आखली आहे.
  • 28.5 कोटी खर्चाच्या योजनेच्या निविदा जेएनपीटीने नुकत्याच प्रसिद्ध करून त्वरेने काम करण्याचे संकेत दिले आहेत.जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी सुरुवातीपासूनच समुद्रात मोठ्या प्रमाणात दगड-मातीचा भराव केला जात आहे.समुद्रात भराव टाकण्याचे काम जेएनपीटीचे पाचवे बंदर उभारणीपर्यंत कायम सुरू राहणार आहे. मात्र. समुद्रात होणार्या भरावामुळे एलिफंटा बेटावरील समुद्रकिनार्यावरील समुद्राची पातळी वाढत आहे.
  • देशात वस्तू व सेवा कर प्रणाली लागू झाल्यानंतर राज्याच्या महसूल वाढीसाठी नवीन कर आकारणीवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे खूप मोठय़ा योजना नव्याने हाती घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे विविध समाजघटकांना थेट लाभ होईल अशा योजना जाहीर करण्याचे धोरण राज्य सरकार स्वीकारण्याची शक्यता आहे.

No comments