Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 18 October 2019

2023 हॉकी विश्वचषकाच्या यजमानपदासाठी भारत शर्यतीत : आगामी 2023 पुरुष हॉकी विश्वचषकासाच्या यजमानपदासाठी भारतही आता शर्यतीत उतरला आहे.जानेवारी 13 ते 19 दरम्यान हॉकी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे, यासाठी हॉकी इंडियाने आपली दावेदा…

2023 हॉकी विश्वचषकाच्या यजमानपदासाठी भारत शर्यतीत :
  • आगामी 2023 पुरुष हॉकी विश्वचषकासाच्या यजमानपदासाठी भारतही आता शर्यतीत उतरला आहे. जानेवारी 13 ते 19 दरम्यान हॉकी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहेयासाठी हॉकी इंडियाने आपली दावेदारी सादर केली आहे.
  • याआधी 3 वेळा भारताने हॉकी विश्वचषकाचं यजमानपद भूषवलं आहे. भारताव्यतिरीक्त बेल्जियम आणि मलेशिया हे दोन देशही यजमानपदाच्या शर्यतीत आहेत.

ग्लोबल हंगर इंडेक्स 2019’ मध्ये भारत 102 या क्रमांकावर :
  • यावर्षीचा ग्लोबल हंगर इंडेक्स’ (GHI) या शीर्षकाखाली एक अहवाल जाहीर करण्यात आला आहे. हा अहवाल जर्मनीची वेल्थ हंगर हिल्फे आणि आयरलॅंडची कंसर्न वर्ल्डवाइड या ना-नफा संस्थांनी तयार केला आहे.
  • अहवालाबाबत: जागतिकराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर कोणत्या भागात किती उपासमारी आहेकिती लोक रोज भुकेपोटी उपाशी राहतात याचे मापन करणारा हा अहवाल आहे. या अहवालात जगभरातील कुपोषण आणि उपासमारीची नोंद कुपोषणबाल मृत्यूदरवयानुसार कमी वाढ (stunting), उंचीनुसार कमी वजन (wasting) अशा चार घटकांमध्ये करण्यात आली आहे.
  • उपासमारीच्या आधारावरून देशांना 0 ते 100 गुण दिले गेले आहेत. त्यात 0 हा अंक सर्वोत्तम म्हणजे उपासमारी नाही. तर 10 पेक्षा कमी गुण म्हणजे देशात उपासमारी फारच कमी आहे. त्याचप्रमाणे 20 ते 34.9 गुणे म्हणजे उपसमारीचे संकट गंभीर झाले आहे. तर 35 ते 49.9 गुण म्हणजे उपासमारीची आव्हानात्मक स्थिती आहे. यापेक्षा अधिक म्हणजे 50 गुण असल्यास संबंधित देशात उपासमारीची स्थिती अत्यंत भयावह असल्याचे समजले जाते.

41 व्या DRDO संचालक परिषदेचे उद्घाटन :
  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे 41 व्या डीआरडीओ संचालक परिषदेचे उद्घाटन झाले.
  • यावेळी तीन दलांचे प्रमुख व डीआरडीओ चे चेअरमन जी सतीश रेड्डी उपस्थित होते.
  • देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सैन्याने तांत्रिक प्रगती सुनिश्चित करण्यासाठी डीआरडीओने घेतलेल्या प्रयत्नांचा या चर्चेत समावेश होता.

कलाम वाचनालयाचे उद्घाटन :
  • डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शासकीय हायस्कूलकुंडमपालम येथे जयंतीनिमित्त आर्क फाऊंडेशन इंडिया आणि रोटरी क्लब ऑफ कोयंबटूर हेरिटेज यांच्यातर्फे कलर थीम असलेल्या डॉ. कलाम वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
  • आर्क फाऊंडेशन इंडियाचे जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टीएम.ए. अपर्णा यांनी अशा वाचनालयाच्या उद्घाटनाच्या उद्देशाने मुलांना संबोधित केले.

दोन हजारच्या नोटांची छपाई बंद
  • रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत दोन हजार रुपयांची एकही नोट छापलेली नाही.
  • माहितीच्या अधिकारांतर्गत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला रिझर्व्ह बँकेने दिलेल्या उत्तरातून ही बाबत उघड झाली.

ब्रिटन व युरोपीय महासंघाची नव्या ब्रेग्झिट करारावर सहमती :
  • 28 सदस्यांच्या युरोपीय महासंघातून ब्रिटनने ३१ ऑक्टोबरच्या मुदतीत बाहेर पडण्यासाठी नव्या ब्रेग्झिट करारावर आपली सहमती झाली असल्याचे ब्रिटन आणि युरोपीय महासंघाने गुरुवारी जाहीर केले.
  • पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या कराराचे उत्कृष्ट करार म्हणून स्वागत केलेतर युरोपीय महासंघाचे अध्यक्ष जीन- क्लॉड जंकर यांनी हा वाजवी आणि संतुलित करार’ असल्याचे सांगतानाचसंघटनेच्या सध्या ब्रसेल्समध्ये सुरू असलेल्या परिषदेत सदस्य देशांनी त्याला मंजुरी द्यावी अशी शिफारस केली.
  • तथापिया कराराला मंजुरी मिळण्यासाठी जॉन्सन यांना संसदेत आवश्यक बहुमत मिळते की नाही हे अद्याप कळायचे असल्याने नव्या कराराचे भवितव्य अधांतरी आहे. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जॉन्सन यांच्या हुजूर पक्षाला पाठिंबा देणाऱ्या नॉर्दर्न आयरिश डेमॉक्रॅटिक युनियनिस्ट पार्टीने (डीयूपी) जॉन्सन यांच्याविरुद्ध उघड बंड केले आहे.

No comments