Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 12 October 2019

द्युती चंदचा राष्ट्रीय विक्रम : भारताची आघाडीची धावपटू द्युती चंद हिने 59व्या राष्ट्रीय खुल्या अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत आपला स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.दोहा येथील जागतिक अ‍…

द्युती चंदचा राष्ट्रीय विक्रम :
  • भारताची आघाडीची धावपटू द्युती चंद हिने 59व्या राष्ट्रीय खुल्या अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत आपला स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.
  • दोहा येथील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरलेल्या 23 वर्षीय द्युतीने 11.22 सेकंद अशी कामगिरी नोंदवत या वर्षी आशियाई स्पर्धेत रचलेला 11.26 सेकंदांचा विक्रम मागे टाकला.
  • तर पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत अमिया कुमार मलिक सर्वात वेगवान धावपटू ठरला. त्याने मलेशियाच्या जोनाथन अनाकमायेपा याला मागे टाकत 10.46 सेकंद अशी वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. पंजाबच्या गुरिंदरवीर सिंग याने कांस्यपदक प्राप्त केले. तसेच एमपी. जबीर याने 400 मीटर अडथळा शर्यतीत 49.41 सेकंद अशी वेळ देत स्पर्धाविक्रमाची नोंद केली.

बास्केटबॉल : वॉशिंग्टन मिस्टिक्सकडे पहिल्यांदा महिला एनबीएचे विजेतेेपद
  • मिस्टिक्सने कनेक्टिकट सनला ३-२ ने हरवले. मिस्टिक्सने बेस्ट ऑफ फाइव्ह गेमच्या मालिकेत अखेरचा सामना ८९-७८ ने जिंकला.
  • कनेक्टिकटची टीम तिसऱ्यांदा फायनलमध्ये पराभूत झाली. ते कधीच किताब जिंकू शकले नाहीत. दुसरीकडे मिस्टिक्स टीम गेल्या वर्षी फायनलमध्ये पराभूत झाली होती.
  • मिस्टिक्सकडून एमा मेसेमेनने २२ आणि एलेना डेले डोनेने २१ गुणांची कमाई केली. दुसरीकडे कनेक्टिकटकडून जोनक्वेल जोनेसने सर्वाधिक २५ गुण बनवले. एमा फायनलमध्ये सर्वाधिक महत्त्वपूर्ण खेळाडू ठरली.

भारत सीमेलगत सौर व पवन प्रकल्प उभारणार :
  • सन 2022 पर्यंत 175 गीगावॉट स्वच्छ ऊर्जा साध्य करण्याचे भारताचे लक्ष्य आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून पाकिस्तानलगत आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सौर आणि पवन प्रकल्प उभारण्याची भारताची योजना आहे. हा प्रकल्प गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात सीमेजवळ 30 किलोमीटर लांबी आणि 20 किमी रूंदीच्या भुखंडावर उभारला जाणार आहे.
  • प्रस्तावित प्रकल्पांमधून प्रत्येकी 2 हजार मेगावॅट ऊर्जेची निर्मिती होणार.प्रकल्प वस्ती नसलेल्या निर्जन जागेवर बांधण्यात येत आहे.
  • सीमेवर राहणार्‍या लोकांच्या गरजा भागविण्याच्या उद्देशाने सीमेजवळच्या वाळवंटी प्रदेशात तेथे निर्माण झालेल्या ऊर्जेचा वापर केला जाऊ शकतो. सध्या भारत 82,580 मेगावॅट सौर ऊर्जेचे उत्पादन घेत आहेजे देशाच्या एकूण ऊर्जेच्या 23% आहे.

महात्मा गांधींवर ब्रिटन काढणार विशेष नाणे :
  • भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती 2 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर गांधीजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ ब्रिटन एक विशेष नाणे काढणार आहे. ब्रिटनचे वित्तमंत्री साजीद जाविद यांनी याबाबत माहिती दिली आहे. महात्मा गांधी यांची शिकवण ही जगासाठी वंदनीय आहे. ती कधीच विसरली जाऊ नये या उद्देशाने ब्रिटनने हे स्मृतिनाणे काढायचे ठरवले आहे’ असं जाविद यांनी सांगितलं.
  • ब्रिटनमध्ये दक्षिण आशियाई देशांतील अनेक नागरिक राहतात. त्यातील अनेकांनी आता ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारले आहे. या समुदायातील प्रभावी व्यक्तींचा सत्कार साजीद यांच्या हस्ते एका समारंभात करण्यात आला.
  • महात्मा गांधी शालेय शिक्षण संपवून 1888 मध्ये लंडनला वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले. तेथे त्यांनी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला. ब्रिटनमध्ये ते बॅरिस्टर झाले. त्यानंतर भारतात परत येऊन वकिली करू लागले. 1931 साली गोलमेज परिषदेसाठी ते लंडनला आले होते. गांधींजींवर गेल्या शंभर वर्षांत एक लाखांवर पुस्तके लिहिली गेली व तेवढ्याच पुस्तकात त्यांचे संदर्भ आले आहेत.

No comments