Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) पृथ्वीवरील सर्वात मोठ्या जल अभिसरण प्रणालीपैकी एक असलेले AMOC याचे संपूर्ण नाव काय आहे?
A) अटलांटिक मेरीटाइम ओव्हरटर्निंग सर्कुलेशन
B) एरियल मेरीटाइम ओव्हरटर्निंग सर्कुलेशन
C) अटलांटिक मेरिडिओनल आऊटर सर्कुलेशन
D) अटलांटिक मेरिडिओनल ओव्हरटर्निंग सर्कुलेशन
2) दिल्ली पोलीसांचे ‘तत्पर’ अॅप कश्या संबंधित आहे?
A) वृद्ध लोकांची सुरक्षा
B) महिलांची सुरक्षा
C) मोबाईलद्वारे FIR नोंदविण्यासाठी व वाहतुकीचे चालान ऑनलाईन भरण्यासाठी
D) बलात्कार पीडितांसाठी
3) कोणता वर्ष तेलंगणा राज्य सरकार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वर्ष म्हणून साजरा करणार आहे?
A) सन 2020
B) सन 2023
C) सन 2025
D) सन 2027
4) SITMEX-19 हा कोणत्या देशांदरम्यानचा त्रिपक्षीय सागरी सराव आहे?
A) श्रीलंका, भारत आणि थायलंड
B) सिंगापूर, भारत, थायलंड
C) श्रीलंका, भारत आणि तिबेट
D) सिंगापूर, भारत आणि तिबेट
5) कोणत्या रेल्वे स्थानकाला ‘ग्रीन प्लॅटिनम रेटिंग’ प्रदान करण्यात आले?
A) सिकंदराबाद
B) प्रयागराज
C) अहमदाबाद
D) कट्टक
6) कोणते ‘सुगम्य भारत अभियान’चे उद्दीष्ट आहे?
A) कोणत्याही शासकीय विभागाची माहिती मिळविणे
B) आधारशी सामाजिक माध्यमे जोडण्यासाठी जेणेकरून एकाच व्यासपीठावर माहिती मिळू शकणार
C) न्यायालयीन कार्यवाहीसंदर्भातली संपूर्ण माहिती उपलब्ध करून देणे
D) देशभरात दिव्यांगजनांसाठी अडथळा विरहीत व अनुकूल वातावरण तयार करणे
उत्तरे
1. (D) अटलांटिक मेरिडिओनल ओव्हरटर्निंग सर्कुलेशन
अटलांटिक मेरिडिओनल ओव्हरटर्निंग सर्कुलेशन (AMOC) हे पृथ्वीवरील सर्वात मोठ्या जल अभिसरण प्रणालीपैकी एक आहे, जिथे समुद्राचा प्रवाह कोमट आणि खारे पाणी उष्ण कटिबंध प्रदेशातून उत्तरेकडील प्रदेशांकडे जसे की पश्चिम युरोपकडे वाहून नेतो आणि दक्षिणेकडे थंड पाणी पाठवतो. हे “अटलांटिक कन्व्हेयर बेल्ट” या नावाने देखील ओळखले जाते.
2. (C) मोबाईलद्वारे FIR नोंदविण्यासाठी व वाहतुकीचे चालान ऑनलाईन भरण्यासाठी
मोबाईलद्वारे FIR नोंदविण्यासाठी व वाहतुकीचे चालान ऑनलाईन भरण्यासाठी दिल्ली पोलीसाने ‘तत्पर’ नावाने नवे मोबाइल अॅप प्रसिद्ध केले आहे.
3. (A) सन 2020
तेलंगणा राज्य सरकारने सन 2020 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
4. (B) सिंगापूर, भारत, थायलंड
19 सप्टेंबर 2019 रोजी SITMEX-19 हा सिंगापूर, भारत आणि थायलंड यांच्यातला सागरी सराव पोर्ट ब्लेअर (अंदमान व निकोबार बेटे) येथे सुरू झाला.
5. (A) सिकंदराबाद
भारतीय हरित इमारत परिषदेकडून (IGBC) भारतीय रेल्वेच्या सिकंदराबाद स्थानकाला ‘ग्रीन प्लॅटिनम रेटिंग’ प्रदान करण्यात आले आहे.
6. (D) देशभरात दिव्यांगजनांसाठी अडथळा विरहीत व अनुकूल वातावरण तयार करणे
दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी सहज वावरणे, प्रवास करणे, संवाद व संपर्क करणे शक्य व्हावे यासाठी ‘अडथळा विरहीत वातावरण’ निर्मितीसाठी अपंगत्व सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकारच्यावतीने ‘सुगम्य भारत अभियान’ (अॅक्सेसीबल इंडिया कॅम्पेन) राबविण्यात येत आहे.
No comments