Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) दिल्ली जिल्हा क्रिकेट संघ (DDCA) याच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नेमलेल्या व्यक्तीचे नाव काय आहे?
A) सचिन तेंडुलकर
B) अतुल वासन
C) कपिल देव
D) सुरेश रैना
2) खालीलपैकी कोणते स्थळ टाइम्स मॅगझीनच्या ‘वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेसेस 2019’ या यादीत सूचीबद्ध केले गेले आहे?
A) स्टॅच्यू ऑफ युनिटी, गुजरात
B) सोहो हाऊस, मुंबई
C) (A) आणि (B)
D) जयपूर, राजस्थान
3) आफ्रिकेत कृषी व कृषी-उद्योगांमध्ये तरुण लोकांना अधिकाधीक रोजगार आणि संधी निर्माण करण्याच्या हेतूने ‘FAO-UNIDO फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह’ने ________ सोबत भागीदारी केली.
A) इकनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स
B) आफ्रिकी संघ
C) सदर्न आफ्रिकन डेव्हलप्मेंट कम्युनिटी
D) ईस्ट आफ्रिकन कम्युनिटी
4) कोणत्या साली आफ्रिकी संघ (AU) याचे अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आले?
A) सन 1999
B) सन 2002
C) सन 1969
D) सन 2000
5) कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाय शोधण्यासाठी कोणत्या संस्थेनी आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय क्षयरोग विभागासोबत सामंजस्य करार केला?
A) वाधवानी इंस्टीट्यूट फॉर आर्टिफिश्यल इंटेलिजेंस
B) भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर
C) भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई
D) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)
6) कोणत्या देशाने ‘गझानवी’ नावाचे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करू शकणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केले?
A) इराण
B) अफगाणिस्तान
C) इराक
D) पाकिस्तान
उत्तरे
1. (B) अतुल वासन
माजी वेगवान गोलंदाज अतुल वासन हे दिल्ली जिल्हा क्रिकेट संघ (DDCA) याच्या वरिष्ठ निवड समितीचे नवे अध्यक्ष आहेत.
2. (C)- (A) आणि (B)
गुजरातमधल्या 597 फूट उंची असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याला टाइम्स मॅगझीनने प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेसेस 2019’ या यादीत स्थान दिले गेले आहे. त्याव्यतिरिक्त मुंबईचे ‘सोहो हाऊस’ या इमारतीनेही या यादीत स्थान मिळवले.
3. (B) आफ्रिकी संघ
आफ्रिकेत कृषी व कृषी-उद्योगांमध्ये तरुण लोकांना अधिकाधीक रोजगार आणि संधी निर्माण करण्याच्या हेतूने संयुक्त राष्ट्रसंघ औद्योगिक विकास संघटना (UNIDO), संयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटना (FAO) आणि आफ्रिकी संघ (African Union -AU) एकत्र आले आहेत. तरुण उद्योजकांसाठी तांत्रिक सहाय्य, क्षमता विकास आणि ज्ञानाची देवाणघेवाण अश्या घटकांवर ‘FAO-UNIDO फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह’ नावाचा हा उपक्रम केंद्रित आहे.
4. (B) सन 2002
आफ्रिकी संघ (African Union) हा आफ्रिका खंडातल्या 55 देशांचा समावेश असलेला एक संघ आहे. आफ्रिकेच्या सर्वांगीण विकासासाठी देशांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हे व्यासपीठ तयार करण्यात आले. जुलै 2002 मध्ये अधिकृतपणे या संघटनेच्या कामकाजाला सुरुवात झाली. त्याचे मुख्यालय इथियोपियाची राजधानी अडीस अबाबा येथे आहे. 2002 साली संघटनेनी ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी (OAU, 1963-1999) या संघटनेची जागा घेतली. आफ्रिकी संघाचे मुख्यालय इथियोपिया देशाची राजधानी अडीस अबाबा या शहरात आहे.
5. (A) वाधवानी इंस्टीट्यूट फॉर आर्टिफिश्यल इंटेलिजेंस
क्षयरोगावर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाय शोधण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय क्षयरोग विभागाने वाधवानी इंस्टीट्यूट फॉर आर्टिफिश्यल इंटेलिजेंस या संस्थेसोबत सामंजस्य करार केला. वाधवानी इंस्टीट्यूट या सहकार्याचा भाग म्हणून राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमास AI क्षमता प्रदान करण्यास मदत करणार आहे.
6. (D) पाकिस्तान
पाकिस्तानने ‘गझानवी’ नावाचे 290 कि.मी.पर्यंत पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करू शकणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केले. हे अनेक प्रकाराची युद्धसामुग्री वाहून नेण्यास सक्षम आहे.
No comments