Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) 2019च्या राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या अभियानाचा प्रारंभ केला?
A) ग्रो इंडिया अभियान
B) प्राउड इंडिया अभियान
C) खेलो इंडिया अभियान
D) फिट इंडिया अभियान
2) ऑगस्ट 2019 मध्ये पर्यावरण मंत्रालयाद्वारे क्षतिपूरक वनीकरणनिधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण (CAMPA) याच्या अंतर्गत 27 राज्यांना किती निधी दिला गेला?
A) 27,436 कोटी रुपये
B) 37,436 कोटी रुपये
C) 47,436 कोटी रुपये
D) 57,436 कोटी रुपये
3) कोणती हवाईसेवा कंपनी 2 ऑक्टोबर 2019 पासून त्याच्या विमानात एकदाच वापरल्या जाणार्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालणार आहे?
A) जेट एयरवेज
B) एयर इंडिया
C) स्कायजेट
D) इंडिगो
4) भारतातली पहिली बॅटरीवर धावणारी सिटी बस सेवा कुठे सुरू झाली?
A) गांधीनगर, गुजरात
B) नवी दिल्ली
C) मुंबई, महाराष्ट्र
D) जयपूर, राजस्थान
5) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोळसा खाण क्षेत्र, कंत्राटी निर्मिती उद्योगांमध्ये _______ टक्के थेट परकीय गुंतवणूकीला (FDI) मंजूरी दिली गेली.
A) 74%
B) 47%
C) 85%
D) 100%
6) ISSF विश्वचषक IV 2019 या स्पर्धेत 10 मीटर एयर रायफल प्रकारात सुवर्णपदक कोणी जिंकले?
A) इलावेनिल वालारीवन
B) अपूर्वी चंदेला
C) अंजली भागवत
D) वरीलपैकी कुणीही नाही
उत्तरे
1. (D) फिट इंडिया अभियान
29 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’ अभियानाचा प्रारंभ केला. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून या लोकचळवळीचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली.
2. (C) 47,436 कोटी रुपये
देशाची हरित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि वनीकरणाला चालना देण्यासाठी पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी 27 राज्यांना 47,436 कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित केला. क्षतिपूरक वनीकरणनिधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण (CAMPA) याच्या अंतर्गत हा निधी देण्यात आला आहे.
3. (B) एयर इंडिया
भारताची हवाईसेवा कंपनी एयर इंडिया 2 ऑक्टोबर 2019 पासून त्याच्या विमानात एकदाच वापरल्या जाणार्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालणार आहे.
4. (A) गांधीनगर, गुजरात
गांधीनगर, गुजरात येथे भारतातली पहिली बॅटरीवर धावणारी सिटी बस सेवा सुरू करण्यात आली. 29 ऑगस्ट 2019 रोजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या सेवेचे उद्घाटन केले.
5. (D) 100%
28 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोळसा खाण क्षेत्र, कंत्राटी निर्मिती उद्योगांमध्ये 100 टक्के थेट परकीय गुंतवणूकीला (FDI) मंजूरी दिली गेली.
6. (A) इलावेनिल वालारीवन
सिनीयर ISSF विश्वचषक IV 2019 या स्पर्धेत 10 मीटर एयर रायफल प्रकारात इलावेनिल वालारीवन हिने सुवर्णपदक जिंकले. रिओ दि जानेरो (ब्राझील) येथे झालेल्या स्पर्धेत हे सुवर्णपदक तिने जिंकले. 20 वर्षीय वालारीवनचे हे विश्वचषकमधले पहिलेच ज्येष्ठ सुवर्णपदक आहे. वालारीवन ही अपूर्वी चंदेला आणि अंजली भागवत यांच्यानंतर विश्वचषकात सुवर्णपदक जिंकणारी तिसरी भारतीय नेमबाज आहे.
No comments