Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) कोणता खेळाडू जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारा/री प्रथम भारतीय आहे?
A) प्रकाश पादुकोण
B) पी. व्ही. सिंधू
C) सायना नेहवाल
D) पुलेला गोपीचंद
2) कोणत्या राज्य सरकारने "कलवी तोलाईकाच्ची" नावाने विशेष शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी सुरू केली?
A) केरळ
B) तेलंगणा
C) आंध्रप्रदेश
D) तामिळनाडू
3) 25 ऑगस्ट 2019 रोजी, द्वैपक्षीय संबंध दृढ करण्यासाठीच्या प्रयत्नांच्या सन्मांनार्थ नरेंद्र मोदी यांना ‘________ ऑर्डर - फर्स्ट क्लास’ हा सन्मान देण्यात आला.
A) संयुक्त अरब अमिरात
B) बहरीन
C) कतार
D) सौदी अरब
4) बहरीन साम्राज्याची राजधानी कोणती आहे?
A) दोहा
B) मस्कट
C) मनामा
D) कुवैत शहर
5) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी 'क्यूआर कोड स्कीम' (हिम्मत प्लस) नावाचा उपक्रम सुरू केला?
A) पंजाब
B) जम्मू व काश्मीर
C) गोवा
D) दिल्ली
6) कोणते भारतीय राज्य शाळेमधील प्रवेशासाठी लसीकरण अनिवार्य करणार आहे?
A) तामिळनाडू
B) ओडिशा
C) कर्नाटक
D) केरळ
7) अमेरिकेने पोलादावर किती टक्के आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली?
A) 12%
B) 22%
C) 18%
D) 25%
उत्तरे
1. (B) पी. व्ही. सिंधू
बासेल (स्वीत्झर्लंड) येथे भारताच्या पी. व्ही. सिंधू ह्या बॅडमिंटनपटूने ऐतिहासिक कामगिरी करताना ‘जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयासह, 24 वर्षीय पी. व्ही. सिंधू जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी प्रथम भारतीय ठरली आहे. 25 ऑगस्ट 2019 रोजी झालेल्या स्पर्धेच्या महिला एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात सिंधूने जापानच्या नोझोमी ओकुहाराचा एकतर्फी धुव्वा उडवला.
2. (D) तामिळनाडू
राज्यातल्या पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने, 26 ऑगस्ट 2019 रोजी तामिळनाडू राज्य सरकारने एक विशेष शैक्षणिक दूरदर्शन वाहिनी (टीव्ही चॅनेल) सुरू केले. "कलवी तोलाईकाच्ची" (एज्युकेशन टीव्ही) असे या वाहिनीचे नाव आहे. चेन्नई येथे राज्याचे मुख्यमंत्री के. पालानीस्वामी यांच्या हस्ते शालेय शिक्षण विभागाच्या पुढाकाराने या वाहिनीचे उद्घाटन केले गेले.
3. (B) बहरीन
24 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बहरीनला भेट दिली. ते या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. दिनही देशांमधले द्वैपक्षीय संबंध दृढ करण्यासाठीच्या प्रयत्नांच्या सन्मांनार्थ बहरीनचे राजा हमाद बिन ईसा अल खलीफा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘बहरीन ऑर्डर – फर्स्ट क्लास’ हा सन्मान देऊन गौरव केला.
4. (C) मनामा
बहरीनचे साम्राज्य हा फारसी आखाती प्रदेशातला एक बेटराष्ट्र आहे. मनामा ही देशाची राजधानी असून बहरीनी दिनार हे देशाचे राष्ट्रीय चलन आहे.
5. (D) दिल्ली
23 ऑगस्ट 2019 रोजी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत महिलांच्या सुरक्षेसंबंधीचा 'क्यूआर कोड स्कीम' (हिम्मत प्लस) नावाचा उपक्रम सुरू केला. महिलांची सुरक्षितता वाढविणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. कोणत्याही प्रकारे प्रवास करणार्या महिला या योजनेच्या अंतर्गत दिल्ली पोलीसांकडे नोंदणी केलेल्या वाहतूक साधनांचा वापर करू शकणार.
6. (D) केरळ
केरळ राज्य शासनाने नव्या आरोग्य धोरणाचा मसुदा सादर केला, ज्यामध्ये शाळेमधील मुलांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र प्रस्तुत करणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे. नवे धोरण पुढील सत्रापासून लागू करण्याचे नियोजित आहे.
7. (D) 25%
अमेरिकेच्या प्रशासनाने पोलाद आणि अॅल्यूमिनियम उत्पादनांवर मोठा आयात शुल्क लागू करण्याबाबत एक योजना तयार केली आहे. योजनेनुसार पोलादावर 25% आणि अॅल्यूमिनियमवर 10% आयात शुल्क लागू केला जाणार आहे.
No comments