Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 17 August 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे

1) 15 ऑगस्ट 2019 रोजी निधन झालेल्या माजी भारतीय फलंदाज आणि राष्ट्रीय निवडकर्त्याचे नाव काय होते?
A) सरनदीप सिंग
B) व्ही. बी. चंद्रशेखर
C) एम. के. प्रसाद
D) गगन शर्मा

2) तामिळनाडू सरकारने 2019 सालासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार’ देऊन कोणाला सन्मानित केले?
A) के. सिवन
B) ए. एस. किरण कुमार
C) के. राधाकृष्णन
D) बी. एन. सुरेश

3) कोणता क्रिडापटू एका दशकात 20,000 आंतरराष्ट्रीय धावा काढणारा पहिला फलंदाज बनला?
A) रोहित शर्मा
B) शिखर धवन
C) विराट कोहली
D) एम. एस. धोनी

4) 15 ऑगस्ट 2019 रोजी निधन झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे नाव काय होते?
A) विद्या सिन्हा
B) तारा सेहगल
C) दिव्या चंद्रा
D) माधवी कुमार

5) मुंबईत 300 कोटी रुपये खर्चून आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र उभारण्यासाठी कौशल्य विकास मंत्रालयाने _______ सोबत भागीदारीची घोषणा केली.
A) रिलायन्स इंडस्ट्रीज
B) इन्फोसिस
C) मायक्रोसॉफ्ट
D) टाटा ट्रस्ट

6) दिपक पुनिया हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A) कुस्ती
B) मुष्टियुद्ध
C) भारोत्तोलन
D) हॉकी

उत्तरे 
1. (B) व्ही. बी. चंद्रशेखर
माजी भारतीय फलंदाज आणि राष्ट्रीय निवडकर्ते व्ही. बी. चंद्रशेखर यांचे 15 ऑगस्ट 2019 रोजी निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. चंद्रशेखर यांनी सन 1988 ते सन 1990 या काळात सात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले होते. त्यांनी 81 खेळीत 4999 धावा केल्या.

2. (A) के. सिवन
15 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याचे वर्तमान अध्यक्ष कैलाशवडीवू सिवन यांचा तामिळनाडू सरकारने डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार’ देऊन सन्मान केला. राज्य सरकारने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भरीव योगदानासाठी सिवन यांचा गौरव केला आहे. तामिळनाडूच्या रहिवासी असणाऱ्या व्यक्तींना तामिळनाडू सरकारच्यावतीने डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो.

3. (C) विराट कोहली
भारतीय कर्णधार विराट कोहली हा एका दशकात 20,000 आंतरराष्ट्रीय धावा काढणारा जगातला पहिलाच फलंदाज बनला. कोहलीने क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये एकूण 20,502 धावा केल्या असून त्यापैकी 20,018 धावा चालू दशकात त्याने केल्या आहेत.

4. (A) विद्या सिन्हा
रजनीगंधा’, ‘छोटी सी बात’ आणि पती पत्नी और वो’ अशा हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केलेल्या विद्या सिन्हा यांचे निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या.

5. (D) टाटा ट्रस्ट
14 ऑगस्ट 2019 रोजी घोषणा केल्याप्रमाणेभारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाने टाटा ट्रस्टसोबत एक भागीदारी करार केला आहेज्यामधून मुंबईत 300 कोटी रुपये खर्चून एक आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र उभारण्याची योजना आहे. करारानुसार केंद्र सरकार मध्य मुंबईत सायन येथे राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेच्या (NSTI) परिसरात चार एकरचा भूखंड उपलब्ध करून देणार आहेतर टाटा ट्रस्ट त्यावर 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक जागतिक दर्जाचे केंद्र उभारणार आणि त्याचे संचालन करणार.

6. (A) कुस्ती
दिपक पुनियाने एस्टोनियामध्ये झालेल्या ज्युनियर वर्ल्ड्स क्रिडास्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आणि या विजयासह तो गेल्या 18 वर्षांमध्ये भारताचा पहिलाच कनिष्ठ विश्वविजेता कुस्तीपटू ठरला. 86 किलो पुरुष फ्रीस्टाईल प्रकारात पुनियाने हे सुवर्णपदक जिंकले.

No comments