Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

सामान्य विज्ञान (भाग 3)

पेशींच्या संघटित समुच्चयाला उती असे म्हणतात.वनस्पतीमध्ये उतीचे दोन प्रकार आढळतात. विभाजी उती आणि स्थायी उती.संयोजी उती या इंद्रिये आणि इतर उतींना एकत्र बांधून ठेवतात.स्नायू उती हालचालीसाठी असतात.फुलांचे निदलपुंज, दलपुंज, पुमंग आण…

  • पेशींच्या संघटित समुच्चयाला उती असे म्हणतात.
  • वनस्पतीमध्ये उतीचे दोन प्रकार आढळतात. विभाजी उती आणि स्थायी उती.
  • संयोजी उती या इंद्रिये आणि इतर उतींना एकत्र बांधून ठेवतात.
  • स्नायू उती हालचालीसाठी असतात.
  • फुलांचे निदलपुंजदलपुंजपुमंग आणि जायांग असे चार भाग असतात.
  • दृश्य केंद्रकी पेशींमध्ये सुस्पष्ट पटल परिबद्धित केंद्रक असतो तर आदि केंद्रकी पेशीमध्ये मात्र सुस्पष्ट पटल परिबद्धित केंद्रक नसतो.
  • जिवाणू पेशी ही आदिकेंद्रकी पेशी आहे.
  • सर्वे शैवालेकवकेप्रोटोझुआवनस्पती आणि प्राणी ही दृश्य केंद्रकी पेशींची उदाहरणे आहेत.
  • डी.एन.ए. हा एकरेषीय व्दिसपीर्ल मोठया आकाराचा रेणू असून तो दोन बहुन्यू क्लिओटाइडसच्या धाग्यापासून तयार होतो.
  • डी.एन.ए. चे मुख्य कार्य म्हणजे जननिक माहितीचे जणूकाच्या रूपात संग्रहण करणे होय.
  • आर.एन.ए. हा सुद्धा बहुन्यूक्लिओटाइडसचा रेषीय रेणू असतो.
  • कुठल्याही जातीसाठी गुणसुत्रांची संख्या कायम असते.
  • मानवमध्ये 46 गुणसत्रे असतता.
  • तंतुकनिकेची लांबी साधारणपणे 1.5 ते 10 um तर रुंदी 0.25 ते 1.00 um यांच्या दरम्यान असते.
  • तंतुकनिकेची मुख्य कार्य म्हणजे ऊर्जानिर्मिती करून ती ए.टी.पी. रूपात साठवून ठेवणे.
  • तंतुकनिकांना पेशींचे ऊर्जाकेंद्र असे म्हणतात.
  • केंद्रकाच्या आधारद्र्व्यास केंद्रक द्रव्य म्हणतात. यामध्ये क्रोमॅटिन असते.
  • ज्या पोषणपद्धतीमध्ये प्रकाशाचा वापर ऊर्जा म्हणून केला जातोत्यास प्रकाश संश्लेषी पोषण पद्धती असे म्हणतात.
  • वरील उदाहरणे – सर्व वनस्पतीशैवालेयुग्लिनाकाही जीवाणू.
  • प्रकाश संश्लेषण अभिक्रियेत रेन्विय प्राणवायूची मुक्तता होते.
  • ज्या पोषणपद्धतीत अकार्बनी रसायानांचा वापर ऊर्जा म्हणून केला जातो त्यास रसायन संश्लेषी पोषण पद्धती असे म्हणतात.
  • उदा. नायट्रोफाईंग जीवाणूलोह उपचयनी जीवाणूगंधक उपचयनी जीवाणू
  • पिचर प्लँटनिपेंथससनड्यू (ड्रोसेरा) यासारख्या किटकाहारी वनस्पती त्याच्या नत्रयुक्त आणि प्रथिन गरजांसाठी कीटक व इतर सूक्ष्म प्राण्यांवर अवलंबून असतात.
  • आपल्या अन्न गरजपूर्तीसाठी दुसर्यार सजीवांवर अवलंबून असणारे सजीव परपोषी म्हणून ओळखले जातात. उदा. प्राणीकवकेबहुकेत जीवाणू.
  • विकरे ही विविध प्रकारची प्रथिने असून पचनसंस्थेच्या विविध अंगांव्दारे त्यांची निर्मिती व स्त्रवण होते.
  • मृतोपजीवी पोषण गट – अनेक कवके (किन्वबुरशी आणि छत्रकवके) जीवाणू.
  • बाह्यपरजीवी – गोचिडडासढेकूणउवा किंवा जळू अमरवेलबांडगुळ.

No comments