रवीश कुमार: नैतिकतापूर्ण पत्रकारीतेसाठी ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2019’ याचे विजेता NDTV या वृत्तसंस्थेचे पत्रकार रवीश कुमार यांना त्यांच्या नैतिकतापूर्ण पत्रकारीतेसाठी यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा केली गेल…
रवीश कुमार: नैतिकतापूर्ण पत्रकारीतेसाठी ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2019’ याचे विजेता
- NDTV या वृत्तसंस्थेचे पत्रकार रवीश कुमार यांना त्यांच्या नैतिकतापूर्ण पत्रकारीतेसाठी यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा केली गेली आहे.
- आवाज नसलेल्यांना आवाज बनण्यासाठी तसेच व्यावसायिक व उच्च गुणवत्तेच्या नैतिक पत्रकारीतेबद्दल अभूतपूर्व वचनबद्धता दर्शविण्यासाठी हा पुरस्कार दिला जात आहे.
- यावर्षी पत्रकारीतेसाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार पाच जणांना दिला जात आहे, त्यात रवीश कुमार यांच्यासह को स्वे विन (म्यानमार), अंगखाना नीलापैजीत (थायलँड), रेमुंडो पुजंते कायाब्याब (फिलिपिन्स) आणि किम जोंग-की (दक्षिण कोरिया) यांचा समावेश आहे.
- रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा फिलिपीन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. हा पुरस्कार फिलिपीन्स सरकारच्या सहमतीने न्युयॉर्क शहरामधील रॉकफेलर ब्रदर्स फंडच्या विश्वस्त मंडळाद्वारे 1957 सालापासून दरवर्षी दिला जातो. रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन तर्फे आयोजित केल्या जाणार्या समारंभात आपापल्या क्षेत्रात उत्कृष्टता मिळविणार्या आशियाई व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार उदयोन्मुख नेतृत्व (2001 सालापासून) आणि वर्गीकृत नसलेले (2009 सालापासून) या दोन श्रेणीमध्ये दिला जातो.
भारतात नियमितपणे बँकिंग सेवा देण्यासाठी बँक ऑफ चायनाला RBIची परवानगी :
- भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) बँक ऑफ चायना या परदेशी बँकेला भारतात नियमितपणे बँकिंग सेवा देण्याची परवानगी दिली आहे.
- 'बँक ऑफ चायना लिमिटेड' याला ‘भारतीय रिझर्व्ह बँक कायदा-1934’ याच्या द्वितीय अनुसूचित समाविष्ट केले गेले आहे.
- SBI, HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक आणि ICICI बँक यासारख्या सर्व व्यवसायिक बँका द्वितीय अनुसूचित आहेत. द्वितीय अनुसूचित मोडणार्या बँकांना RBIच्या निकषांचे पालन करावे लागते. सोबतच, 'जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड' याचा देखील द्वितीय अनुसूचित समावेश करण्यात आला आहे.
- त्याव्यतिरिक्त, द्वितीय अनुसूचित 'रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड पब्लिक लिमिटेड कंपनी' याचे नाव बदलून 'नॅटवेस्ट मार्केट्स पब्लिक लिमिटेड कंपनी (plc)' करण्यात आले आहे. दरम्यान, 'नॅशनल ऑस्ट्रेलिया बँक' याने बँकिंग नियमन कायद्याच्या व्याखेत एक बँकिंग कंपनी म्हणून काम करणे थांबविले आहे.
चांद्रयान-2 ने गाठला आणखी एक टप्पा; चौथ्यांदा बदलली कक्षा :
- भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांनी शुक्रवारी संध्याकाळी चांद्रयान-2 ची कक्षा यशस्वीरित्या बदलली. कक्षा बदलाचा हा चौथा टप्पा होता. चांद्रयान 2 ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजून 27 मिनिटांनी चांद्रयान-2 च्या कक्षेत यशस्वीरित्या बदल करण्यात आला. चांद्रयान-2 पृथ्वीपासून किमान (पेरिजी) 277 किमी आणि कमाल (एपोजी) 89 हजार 472 किमी अंतरावर स्थिरावण्यात आले. आता 6 ऑगस्ट रोजी चांद्रयानाची कक्षा पुन्हा बदलण्यात येणार आहे.
- चांद्रयान 2 चा प्रवास योग्य दिशेने सुरु आहे असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. प्रत्येकवेळी कक्षा बदल करताना चांद्रयान 2 ला ऊर्जा मिळणार आहे. कक्षा वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे चांद्रयान 2 मध्ये पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण होणार आहे. आता पुढचा कक्षा बदल सहा ऑगस्टला करण्यात येणार आहे.
- 14 ऑगस्टला चांद्रयान 2 चा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु होईल. 20 ऑगस्टला चांद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. तीन सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लँडर चंद्रावर उतरेल. भारताच्या या महत्वकांक्षी चांद्रयान 2 मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले आहे. चंद्रावर पाण्यासह अन्य अनेक नवीन गोष्टी शोधून काढण्याचा चांद्रयान 2 चा प्रयत्न असेल.
भारतीय अंतराळवीरांना ‘व्योमनॉट्स’ म्हणून ओळखले जाणार :
- भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ 2022 पर्यंत अंतराळामध्ये अंतराळवीर पाठवणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. भारताला अमृतमोहोत्सवी स्वातंत्र्य वर्षातच इस्रो पहिला भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची तयारी करत आहे. तर भारताच्या या अंतराळवीराला अँस्ट्रोनॉट नाही तर ‘व्योमनॉट’ असे म्हटले जाईल.
- भारताची ही मोहिम यशस्वी झाल्यास अंतराळात मानवरहीत मोहिम करणार भारत चौथा देश ठरेल. या आधी हा पराक्रम रशिया, अमेरिका आणि चीनने केला आहे. भारतीयांना अंतराळात पाठवण्याच्या मोहिमेला गगनयान असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत एका आठवड्यासाठी तीन भारतीय अंतराळवीरांना अंतराळ पाठवले जाणार आहे.
- अमेरिकेमध्ये अंतराळवीरांना ‘अॅस्ट्रोनॉट’ म्हणतात तर रशियामध्ये अंतराळवीरांना ‘कॉस्मोनॉट्स’ म्हणतात. चीनमध्ये अंतराळवीरांना ‘ताइकोनॉट्स’ असं म्हणतात. याच पार्श्वभूमीवर भारत आपल्या अंतराळवीरांना ‘व्योमनॉट्स’ या नावाने ओळखले जाणार आहे.
- ‘व्योमनॉट्स’मध्ये ‘व्योमन्’ हा संस्कृत शब्द आहे. या शब्दाचा अर्थ अंतराळ असा होतो. अनेकदा अकाश या अर्थानेही हा शब्द वापरला जातो. त्यामुळेच व्योमन् या शब्दापुढे अॅस्ट्रोनॉटमधील नॉट्स ही अक्षरे लावून ‘व्योमनॉट्स’ हा शब्द तयार झाला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेची सातव्या क्रमांकावर घसरण :
- जागतिक महासत्ता होण्याची स्वप्न पाहणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेला धक्का देणारी जागतिक बँकेने जाहीर केलेली आकडेवारी समोर आली असून जगातील पाचव्या क्रमांकाला असणाऱ्या भारतीय अर्थव्यस्थेची दोन स्थानांनी पिछेहाट झाली आहे.
- तर युनायटेड किंगडम आणि फ्रान्सने जागतिक अर्थव्यस्थांच्या यादीमध्ये मागे टाकले असून अनुक्रमे पाचवे आणि सहावे स्थान मिळवले आहे. त्यामुळे आता भारत या यादीमध्ये सातव्या क्रमांकाला फेकला गेला आहे.
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करताना पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं उद्दिष्ट पुढच्या काही वर्षांमध्ये नक्की गाठू असा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळेच ही
- आकडेवारी मोदी सरकार आणि सरकारच्या आर्थिक धोरणांसाठी धक्का असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 2017 साली भारतीय अर्थव्यस्थेचा आवाका 2.65 ट्रिलियन डॉलर इतका होती. त्यावेळी भारताची अर्थव्यस्था ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यस्था होती. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार 2017 साली युनायटेड किंग्डम 2.64 ट्रिलियन डॉलरसहीत सहाव्या आणि फ्रान्स 2.59 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसहीत जागतिक अर्थव्यवस्थांच्या यादीमध्ये सातव्या स्थानी होता.
No comments