थायलंड ओपन आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत आशीष कुमारला सुवर्णपदक : आशीष कुमार ह्याने 27 जुलै 2019 रोजी थायलंड ओपन आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतले पहिले आंतराष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. 75 किलो वजनी गटात त…
थायलंड ओपन आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत आशीष कुमारला सुवर्णपदक :
- आशीष कुमार ह्याने 27 जुलै 2019 रोजी थायलंड ओपन आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतले पहिले आंतराष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. 75 किलो वजनी गटात त्याने सुवर्णपदक पटकावले. त्याने जेतेपदाच्या लढतीत कोरियाच्या किम जिनाजे याचा पराभव केला.
- बँकॉक येथे पार पडलेल्या या स्पर्धेत भारताने एकूण आठ पदकांची कमाई केली आहे. भारताने या स्पर्धेत एक सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कास्यपदकांची कमाई केली.
- निखत झरीन (51 किलो), दीपक (49 किलो), मोहम्मद हसमुद्दिन (56 किलो) आणि ब्रिजेश यादव (81 किलो) हे रौप्यपदक जिंकणारे भारतीय खेळाडू आहेत. तर मंजू राणी (48 किलो), आशीष (69 किलो) आणि भाग्यवती कचरी (75 किलो) यांनी कास्यपदके जिंकली.
किसान क्रेडिट कार्ड’ योजनेतून आता मच्छीमारांनाही मिळणार अनुदान :
- ‘किसान क्रेडिट कार्ड’ योजनेतून शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर पैसे दिले जातात. त्यातून शेतकरी शेतीसाठी लागणारी साधनसामुग्री घेतो. त्याचप्रमाणे, आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांसह मच्छीमारांसाठीही किसान के्रडिट कार्ड योजनेचा लाभ देऊ केला आहे. यातून मच्छीमार मासेमारीसाठी लागणारी साधनसामुग्री घेऊन व्यवसाय करू शकतो.
- करंजा मच्छीमार सोसायटीचे संचालक हेमंत गौरीकर यांनी सांगितले की, या योजनेनुसार दोन लाखांपर्यंतचे कर्ज सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी देणे क्रमप्राप्त आहे, असा आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. सरकारची योजना चांगली असून, कराचा विषय शिथिल केला, तर त्याचा फायदा मच्छीमारांना होईल. मच्छीमार हा सहकार आणि असहकारी संस्थेच्या माध्यमातून आपला व्यवसाय करत असतो, परंतु किसान के्रडिट कार्ड योजनेचा लाभ आता मच्छीमारांनाही मिळणार आहे.
- मत्स्यव्यवसायातील मासेमारी, मत्स्यपालन करणाºयांना किसान के्रडिट कार्ड योजनेतून अनुदान मिळणार आहे. कोळी बांधव योजनेंतर्गत मिळालेल्या रुपयांतून मारेमारीसाठी लागणारे साहित्य विकत घेऊ शकतो. मच्छीमार आपल्या जवळच्या बँकेत जाऊन या योजनेची माहिती घेऊन अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.
- प्रसिद्ध भारतीय वाळूशिल्पकार आणि पद्म पुरस्कार विजेते सुदर्शन पटनाइक यांना अमेरिकेतील नामांकित वालुका शिल्प महोत्सवातील 'पीपल्स चॉइस अॅवॉर्ड' मिळाले आहे. समुद्रातील प्लास्टिकचा सामना करण्याविषयी त्यांनी वाळूशिल्प साकारले आहे.
- मॅसॅच्युसेट्समधील बॉस्टन येथील यंदाच्या 'रिव्हर बीच' या आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प महोत्सवात सहभागी होण्यासाठी जगभरातील सर्वोत्तम १५ वाळूशिल्पकारांची निवड करण्यात आली होती. त्यात पटनाइक यांचा समावेश होता. त्यांनी 'प्लास्टिकचे प्रदूषण थांबवा आणि आपला समुद्र वाचवा' हे वालुकाशिल्प साकारले. त्यासाठी त्यांना 'पीपल्स चॉइस अॅवॉर्ड' ने गौरविण्यात आले.
- हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून, अमेरिकेकडून झाला असला, तरी हा भारताचा गौरव आहे. भारतदेखील प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करत आहे. माझ्या वाळूशिल्पासाठी लोकांनी केलेल्या मतदानामुळेच तो विषय प्रकाशझोतात आला आणि प्लास्टिक प्रदूषणाविषयी अनेक नागरिकांना काळजी वाटत असल्याचे दिसले, अशी प्रतिक्रिया या सन्मानानिमित्त बोलताना पटनाइक यांनी दिली.
विदिशा बालियान: मिस डेफ वर्ल्ड 2019
- एम्पुमलांगा (दक्षिण आफ्रिका) येथे “मिस्टर अँड मिस डेफ वर्ल्ड 2019” ही सौंदर्य स्पर्धा पार पडली. “मिस्टर अँड मिस डेफ वर्ल्ड” ही आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेषताः बधिर व्यक्तींसाठी घेतली जाणारी सौंदर्य स्पर्धा आहे.
- भारताच्या उत्तरप्रदेश राज्यामधील 21 वर्षीय विदिशा बालियान हिने मिस डेफ वर्ल्ड 2019 याचा मुकुट जिंकला. ती हा मुकुट जिंकणारी पहिलीच भारतीय ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेची स्पर्धक उपविजेता ठरली.
- तर 2019 या वर्षाचा मिस्टर डेफ वर्ल्ड हा किताब दक्षिण आफ्रिकेच्या 24 वर्षीय फुमेलेला मापुकाता ह्याने जिंकला.
- विदिशा बालियान हिने फेब्रुवारीमध्ये मिस डेफ इंडिया हा किताब जिंकला होता. ती माजी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू आहे आणि तिने डेफलिम्पिक या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्यात तिने भारतासाठी रौप्यपदकही जिंकले होते. पाठीतल्या दुखापतीनंतर तिने सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला.
मेरी कोमने इंडोनेशियामधील प्रेसिडेंट कपमध्ये पटकावलं सुवर्णपदक :
- सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या भारताच्या एमसी मेरी कोमने इंडोनेशियामधील प्रेसिडेंट कपमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. मेरी कोमने 51 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाच्या एप्रिल फ्रॅन्कचा धुव्वा उडवला.
- मेरीने ही लढत 5-0 अशी एकतर्फी जिंकली. पुढच्या महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पार्श्वभूमीवर मेरीचं हे यश महत्वाचं मानलं जात आहे. रशियात होणाऱ्या बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी बजावून ऑलिम्पिकचं तिकीट मिळवण्याचा मेरी कोमचा प्रयत्न राहील.
- सुवर्णपदक जिंकल्यानंतर मेरीने ट्विटरद्वारे तिचा आनंद व्यक्त केला. मेरीने तिच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, प्रेसिडेंट्स कपमध्ये मला मिळालेलं हे सुवर्णपदक हे देशासाठी आहे. या विजयामुळे एक गोष्ट कळली आहे की, मी अजून पुढे जाण्यासाठी सज्ज आहे.
- मेरीने म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही एखादी मोठी स्पर्धा जिंकता, तेव्हातुम्ही अपार कष्ट घेतलेले असतात, इतर स्पर्धकांच्या तुलनेत तुम्ही जास्त प्रयत्न केलेले असतात. त्यामुळेच तुम्ही जिंकता. यावरुन मला पुढे जाण्याची अधिक प्रेरणा मिळते. मी माझे प्रशिक्षक, सहयोगी स्टाफ, क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांचे आभार मानते.
माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे निधन
- माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे रविवारी पहाटे दीड वाजता न्यूमोनियामुळे हैदराबाद येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. उत्तम वक्तृत्व शैलीमुळे रेड्डी त्यांची संसदेसह कर्नाटक विधानसभेतील त्यांची भाषणे विशेष गाजली होती.
- पोलिओ असूनही राजकीय उंची गाठण्यामध्ये त्यांचे अपंगत्व कधीही आड आले नाही. ते लोकसभेत पाच वेळा खासदार; तर राज्यसभेत ते दोन वेळा खासदार होते; तसेच, चार वेळा ते आमदार होते. १९७५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर त्यांनी काँग्रेसला राजीनामा देऊन जनता पक्षात प्रवेश केला होता.
- मेडक मतदारसंघातून १९८० मध्ये इंदिरा गांधींच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढली होती; परंतु त्या वेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर २१ वर्षांनी १९९९ मध्ये ते पुन्हा काँग्रेसवासी झाले होते. अद्वितीय वाक्चातुर्य आणि भाषण कौशल्याच्या आधारावर त्यांना युनायटेड फ्रंट आणि नॅशनल फ्रंट सरकार; तसेच काँग्रेस पक्षाचे प्रवक्तेपद देण्यात आले होते
देशात वाघांच्या संख्येत १८ ते २० टक्क्यांनी वाढ :
- देशात वर्ष २०१४ नंतर वाघांच्या संख्येत ४०० ने वाढ झाली आहे. ही वाढ १८ ते २० टक्के इतकी आहे. २०१४ मध्ये देशात २ हजार २२६ वाघ होते. तर २०१० मध्ये हीच संख्या १ हजार ७०६ इतकी होती. जाणकारांनी देशातील वाघांची संख्या २ हजार ६०० इतकी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
- सोमवारी नवी दिल्ली येथे सकाळी ९.३० वाजता जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील वाघांची अंतिम संख्या जाहीर करणार आहेत. तसेच, ऑल इंडिया टायगर एस्टीमेशन रिपोर्ट - २०१८ देखील प्रसिद्ध करणार आहेत. यावेळी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत. २००६ मध्ये प्रोजेक्ट टायगरची पुनर्रचना झाल्यानंतरचा हा चौथा अहवाल आहे. राष्ट्रीय व्याघ्र गणना दर चार वर्षांनी केली जाते.
- कर्नाटक राज्याने २०१४ (संख्या ४०६) प्रमाणेच व्याघ्र संख्येत प्रथम स्थान काय ठेवले आहे. कर्नाटकात सध्या वाघांची संख्या ५०० इतकी आहे. तर, त्याच्या पाठोपाठ मध्य प्रदेश, उत्तराखंडचा क्रमांक लागतो. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) वाघांच्या मृत्यू संबधीच्या अहवालानुसार २०१२ ते २०१८ या वर्षात ७६५ वाघांचा मृत्यू झाला. यापैकी १३८ वाघांची शिकार करण्यात आल्याचे समोर आले आहे.
- २००६ मध्ये देशातील वाघांची संख्या १ हजार ४११ वर आल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात होती. त्यानंतर केंद्र सरकार आणि विविध पर्यावरणवादी संस्थांनी एकत्र येत 'वाघ वाचवा' मोहीम हाती घेतली. २०१० साली या मोहिमेला यश आले आणि २०१० साली वाघांची संख्या १ हजार ७०६ वर पोहोचली. तर, त्यानंतर २०१४ साली वाघांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यात कर्नाटक ४०६ सख्येसह प्रथम क्रमांकावर होते. त्या पाठोपाठ उत्तराखंड, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागला होता.
No comments