भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती ऑगस्ट महिन्यात : विश्वचषक विजेते माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीकडे भारताच्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक नेमण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पदासाठीच्…
भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती ऑगस्ट महिन्यात :
- विश्वचषक विजेते माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीकडे भारताच्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक नेमण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पदासाठीच्या मुलाखती ऑगस्टच्या मध्यावर होणार आहेत.
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. कपिल यांच्यासह या समितीवर माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी आणि माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचा समावेश आहे.तर त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती पुरुषांच्या प्रशिक्षकाची नेमणूक करणार आहे. ऑगस्ट महिन्यात मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण होईल.
- तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अरुण, बांगर आणि श्रीधरन यांना आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विविध प्रशिक्षकपदांसाठी अर्ज मागवले असून, प्राथमिक पडताळणीनंतर मुलाखत प्रक्रिया पार पडेल.
लाहोर येथील बायोमेकॅनिक्स लॅबला ICC ची मान्यता :
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनी (ICC) पाकिस्तान देशातल्या लाहोर या शहरात पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (PCB) उभारण्यात आलेल्या “बायोमेकॅनिक्स लॅब” याला मान्यता दिली.
- पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (PCB) संशयास्पद वाटणारी गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंसाठी एक तपास केंद्र म्हणून “बायोमेकॅनिक्स लॅब” उभारलेली आहे. ही प्रयोगशाळा लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस (LUMS) येथे उभारण्यात आली आहे आणि ICC या संस्थेद्वारे मान्यता देण्यात आलेली पाचवी बायोमेकॅनिक्स लॅब आहे.
- या ठिकाणी इतर मान्यताप्राप्त केंद्रासारखी प्रगत उपकरणे आणि सॉफ्टवेअर आहेत. या ठिकाणी तीन मापदंडांच्या अंतर्गत माहिती तयार करण्यास सक्षम असलेली किमान 12 हायस्पीड कॅमेरासह मोशन अनॅलिसिस सिस्टम बसविण्यात आली आहे.
- शाहरीर खान PCBचे अध्यक्ष असताना 2015-16 या वर्षी प्रयोगशाळेचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंच्या बेकायदेशीर गोलंदाजीची अनेक प्रकरणे नोंदविण्यात आली.
संसदीय समित्यांची नियुक्ती :
- संसदेच्या विविध समित्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली असून अत्यंत महत्त्वाची वित्तीय समिती लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- संरक्षण, रेल्वे, कररचना, नागरी विकास तसेच केंद्र सरकारच्या योजनांच्या ताळेबंदावरील महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालाची छाननी करण्याची जबाबदारी लोकलेखा समितीकडे असते.तर गेल्या वर्षी राफेल विमानांच्या खरेदीसंदर्भातील कॅगचा अहवाल लोकलेखा समितीकडे दिल्याचा दावा केंद्र सरकारने केल्यानंतर वाद निर्माण झाला होता.
- तसेच केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्याचे काम लोकलेखा समिती अप्रत्यक्षपणे करत असते. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याकडे या समितीचे अध्यक्षपद दिले जाते. मात्र गेल्या लोकसभेप्रमाणे नव्या लोकसभेतही विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला संख्याबळाअभावी मिळालेले नाही.
- विरोधी पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाचे गटनेते या नात्याने अधीर रंजन चौधरी यांच्याकडे लोकलेखा समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. या समितीतील 22 सदस्यांपैकी सात राज्यसभेचे सदस्य आहेत.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS): भारतातली सर्वाधिक मौल्यवान कंपनी
- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही पुन्हा एकदा देशातली सर्वाधिक मौल्यवान कंपनी बनली.
- दिनांक 25 जुलै 2019 रोजी शेयर मार्केटचा व्यापार बंद झाला तेव्हा बाजारपेठेच्या मूल्याप्रमाणे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) याचे एकूण बाजार भांडवल (market capitalisation / m-cap) 7,98,620.04 कोटी रुपये होते. तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे भांडवल 7,81,164.46 कोटी रुपये होते.
- बाजार भांडवलाप्रमाणे शीर्ष 5 मौल्यवान कंपन्यांच्या यादीत HDFC बँक (6,24,666.23 कोटी रुपये), HDFC (3,78,824.35 कोटी रुपये) आणि HUL (3,75,809.46 कोटी रुपये) यांचा देखील क्रम लागला आहे.
‘हे’ आहेत २१२ कोटींचे वार्षिक वेतन घेणारे भारतीय :
- ग्रॅफाइट इलेक्ट्रोड्स तयार करणाऱ्या एचइजी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवि झुंझुनवाला हे 2018-19 या आर्थिक वर्षात सर्वाधित वेतन घेणारे व्यक्ती ठरले आहेत. या आर्थिक वर्षात त्यांनी 121.27 कोटी रूपयांचे वेतन घेतले. गेल्या आर्थिक वर्षापेक्षा त्यांचे सुरू आर्थिक वर्षातील वेतन तब्बल 180 टक्क्यांनी अधिक आहे. सर्वाधिक वेतन घेणाऱ्या व्यक्तीच्या यादीत ते आता पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
- सुरू आर्थिक वर्षात ग्रॅफाइच्या किंमतीत रेकॉर्ड वाढ झाली होती. त्याचाच फायदा एचइजी कंपनीला झाला होता. दरम्यान, कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत घट झाली असल्याचे सांगत त्यांच्या वेतनात आणि भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ ही अयोग्य असल्याचे कॉर्पोरेट गव्हर्नंन्सवर देखरेख ठेवणाऱ्यांकडून सांगण्यात आले. अद्याप सर्व कंपन्यांनी आपले अॅन्युल रिपोर्ट सादर केले नाहीत. परंतु अन्य कंपन्यांची आकेडवारी आल्यानंतर झुंझुनवाला पहिल्या क्रमांकावरून घसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
No comments