Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 25 July 2019

ICMR-NIOH सह नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ मायनर्स हेल्थचे विलीनीकरण :
केंद्रीय मंत्रिमंडळने अलीकडेच नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ मायनर्स हेल्थNIMHमध्ये ICMR – नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थNIOHविलीन करण्याची मंजुरी दिली आहे. या केंद्रीय मं…

ICMR-NIOH सह नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ मायनर्स हेल्थचे विलीनीकरण :
  • केंद्रीय मंत्रिमंडळने अलीकडेच नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ मायनर्स हेल्थNIMHमध्ये ICMR – नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थNIOHविलीन करण्याची मंजुरी दिली आहे. या केंद्रीय मंत्रिमंडळाचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीNIMHविसर्जित करण्यासाठी आणिICMR-NIOH,अहमदाबादमध्ये विलीन करण्यास मान्यता दिली.
  • हे विलीनीकरण NIMHमध्ये सर्व काम करणाऱ्या व्यक्तींना NIOHमध्ये समान पोस्ट / पे स्केलमध्ये सामावून घेईल आणि त्यांचे वेतन संरक्षित केले जाईल. दोन्ही संस्था व्यावसायिक आरोग्यामध्ये तज्ञ आहेत आणि हे विलीनीकरण सार्वजनिक पैशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनाव्यतिरिक्त वाढीव तज्ञांच्या टर्ममध्ये फायदेशीर ठरेल.

चांद्रयान - २’ ची कक्षा बदलण्यात इस्रोच्या शास्त्राज्ञांना यश :
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रो) च्या शास्त्रज्ञांनी आपली दुसरी चांद्र मोहीम चांद्रायन-२’ ला यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत पुढे नेणे सुरू केले आहे. २२ जुलै रोजी अवकाशात झेपावल्यानंतर ते पृथ्वीपासून किमान (पेरिजी) १७० किमी व कमाल (एपोजी) ४५ हजार १४७५ किमी अंतरावर स्थिरावण्यात आले होते. याच कक्षेत असताना आज दुपारी २ ते २.३० वाजेदरम्यान यात यशस्वीरित्या बदल करण्यात आले. आता याची पेरिजी २३० किमी आणि एपोजी ४५ हजार १६३ किमी करण्यात आली आहे.
  • आता सहा ऑगस्टपर्यंत पृथ्वीच्या चारही बाजूंनी चांद्रयान-२ च्या कक्षेला बदलले जाईल. २२ जुलैनंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहचण्यासाठी चांद्रयान-२’ चा ४८ दिवसांचा प्रवास सुरू झाला आहे. श्रीहरिकोटा येथून झेपावल्याच्या १६.२३ मिनिटानंतर चांद्रयान -२ पृथ्वीपासून जवळपास १७० किमी उंचीवर जीएसएलव्ही एमके ३’ या प्रक्षेपकापासून वेगळे होऊन पृथ्वीच्या कक्षेत फिरत होते.
  • चांद्रयान -२ अंतराळात २२ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत पृथ्वीच्या चारही बाजूंनी फिरत राहील. यानंतर १४ ऑगस्ट ते २० ऑगस्टपर्यंत चंद्राकडे जाणाऱ्या लांब कक्षेतील प्रवास करेल. २० ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या कक्षेत पोहचेल. यानंतर ११ दिवस म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत ते चंद्राच्या चारही बाजूंनी फिरत राहील.
  • त्यानंतर १ सप्टेंबर रोजी विक्रम लॅण्डर ऑर्बिटरपासून वेगळे होईल आणि चंद्राच्या दक्षिणी ध्रुवाच्या दिशेने वाटचाल सुरू करेल. पाच दिवसांच्या प्रवासानंतर ६ सप्टेंबर रोजी विक्रम लॅण्डर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेलयानंतर चार तासांनी रोवर प्रज्ञान लॅण्डरपासून निघून चंद्राच्या पृष्ठभागावर विविध प्रयोग करण्यासाठी उतरेल.

बोस यांच्या रशियातील वास्तव्याची कागदपत्रे नाहीत :
  • भारताने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वास्तव्याची माहिती मिळण्यासाठी रशियाला अनेकदा विनंत्या केल्या असून तेथील अभिलेखागारात कुठलीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे त्यांनी कळवले आहेअशी माहिती लोकसभेत बुधवारी देण्यात आली.
  • एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी म्हटले आहे कीभारताने नेताजी सुभाषचंद्र बोस हे ऑगस्ट १९४५  पूर्वी किंवा नतर रशियात होते कीनाही याबाबत रशियाकडे माहिती मागितली होती. बोस यांच्या वास्तव्याची माहिती रशियाकडे असण्याची शक्यता गृहित धरून २०१४ पासून अनेकदा विनंत्या करण्यात आल्यात्यानुसार शोध घेतला असता त्यांना रशियातील अभिलेखागारात कुठलीही कागदपत्रे सापडेलेली नाहीत.
  • सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना १९४२ मध्ये केली व जपानी लष्कराच्या पाठिंब्याने त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला. नेताजींचा मृत्यू तैवान येथील अपघातात १८ ऑगस्ट १९४५ रोजी झाला होता.

ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी गुजराती महिलेची नियुक्ती :
  • ब्रिटनचे माजी परराष्ट्र मंत्री आणि लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन ब्रिटन यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. माजी पंतप्रधान थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर बोरिस जॉन्सन हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. बोरिस यांच्या मंत्रीमंडळाचीही घोषणा झाली असून त्यामध्ये एका भारतीय वंशाच्या महिलेचा समावेश आहे.
  • बोरिस यांच्या मंत्रीमंडळात प्रीती पटेल यांना गृहमंत्री पदावर नियुक्त करण्यात आले आहे. गृहमंत्री पदी विराजमान होणाऱ्या पटेल या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. विशेष म्हणजे पटेल यांच्या नियुक्तीमुळे ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच एक गुजराती व्यक्ती गृहमंत्री झाली आहे.
  • ब्रेग्झिटवरुन ब्रिटन सरकारवर उघडपणे टिका करणाऱ्या पटेल या बोरिस यांच्या समर्थक आहेत. पटेल या कंझर्वेटीव्ह पक्षाच्या बॅक बोरिस’ मोहिमेच्या प्रमुख सदस्यांपैकी एक होत्या. बोरिस यांना पाठिंबा देणाऱ्या पटेल यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता सुरुवातीपासूनच व्यक्त केली जात होती.
  •  ‘नवे मंत्रीमंडळ हे आधुनिक ब्रिटन आणि कंझर्वेटीव्ह पक्षाच्या आधुनिक धोरणांचा पुरस्कार करणारे असावे,’ असं मत पटेल यांनी मंत्रिमंडळाची घोषणा होण्याच्या काही तास आधी केली होती. मूळच्या गुजराती असणाऱ्या पटेल या ब्रिटनमधील भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. भारतीयांनी आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांना पटेल आवर्जून उपस्थित राहतात. पटेल या भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या समर्थक आहेत.

माहिती अधिकाराच्या दुरुस्तीला तूर्त लगाम :
  • माहितीच्या अधिकाराचा कायदा कमकुवत करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असून प्रवर समितीत सखोल चर्चा केल्याशिवाय या कायद्यात दुरुस्ती होऊ दिली जाणार नाहीअशी ठाम भूमिका राज्यसभेतील विरोधी पक्षांनी घेतली. राज्यसभेत विरोधी पक्षाचे बहुमत असल्याने केंद्र सरकारने माहिती अधिकारात दुरुस्ती करणारे विधेयक बुधवारी मांडले नाही.
  • लोकसभेत चार तासांच्या चर्चेनंतर मंगळवारी हे विधेयक मंजूर करण्यात आले. ते बुधवारी राज्यसभेत मांडले जाणार होते. राज्यसभेत सत्ताधारी एनडीएकडे ११६ खासदारांचे संख्याबळ असून त्यांना बहुमतासाठी आणखी पाच खासदारांची गरज आहे. राष्ट्रीय तेलंगण समिती आणि बिजू जनता दल हे दोन्ही पक्ष विषयानुरूप केंद्र सरकारला पाठिंबा देतात. माहिती अधिकारातील दुरुस्तीला या दोन्ही पक्षांनी आक्षेप घेतलेला आहे.
  • यूपीए’ च्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने माहिती अधिकाराचा कायदा बनलेला होता. सोनिया गांधी यांनी या कायद्यातील दुरुस्तींना विरोध दर्शवला असून त्यांनी जाहीर निवेदनही प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे बुधवारी राज्यसभेतील काँग्रेसच्या खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला.विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या दालनात विरोधी पक्ष नेत्यांच्या झालेल्या बैठकीत हे दुरुस्ती विधेयक प्रवर समितीकडे पाठवण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यसभेत हे विधेयक मांडले तर तातडीने संमत होण्याची शक्यता नसल्याचे दिसल्यानंतर केंद्र सरकारने हे दुरुस्ती विधेयक मांडण्याचे टाळले.

No comments