रणगाडाभेदी ‘नाग’ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण :
भारतीय सेनेने राजस्थानातील पोखरण फायरींग रेंजवर स्वदेशी बनावटीच्या तिसऱ्या पिढीतील एंटी – टँक गाइडेड मिसाइल (एटीजीएम) ‘नाग’ चे परीक्षण यशस्वीरित्या पुर्ण केले. तर हे परीक्षण 7 ते 1…
- भारतीय सेनेने राजस्थानातील पोखरण फायरींग रेंजवर स्वदेशी बनावटीच्या तिसऱ्या पिढीतील एंटी – टँक गाइडेड मिसाइल (एटीजीएम) ‘नाग’ चे परीक्षण यशस्वीरित्या पुर्ण केले. तर हे परीक्षण 7 ते 18 जुलै दरम्यान करण्यात आले. नाग ही तिसऱ्या पिढीची रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा आहे.
- तसेच या क्षेपणास्त्राची निर्मितीचे कार्य या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होईल. आतापर्यंत याची चाचणी सुरू होती. 2018 मध्ये या क्षेपणास्त्राची हिवाळी चाचणी घेण्यात आली होती. भारतीय सेना 8 हजार नाग क्षेपणास्त्रांची खरेदी करू शकते, ज्यापैकी सुरूवातीस 500 क्षेपणास्त्रांची ऑर्डर दिली जाण्याची शक्यता आहे. या क्षेपणास्त्राची निर्मिती भारतात क्षेपणास्त्र तयार करणारी एकमेव सरकारी कंपनी भारत डायनामिक्स लिमिटेड करणार आहे.
चित्तथरारक चांद्र मोहिमेची आज पन्नाशी :
- मानवाच्या चांद्रविजयाला आज (शनिवारी) ५० वर्षे पूर्ण होत आहेत. २० जुलै १९६९ रोजी मानवाने चांद्रविजय मिळवला, तेव्हा ते अज्ञाताच्या प्रांतातील सर्वात मोठे पाऊ ल होते. मानवाच्या या अभूतपूर्व विजयाचा सोहळा जगाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जात असून, समाज माध्यमांमध्ये देखील त्या महत्त्वपूर्ण क्षणांना उजाळा दिला जात आहे.
- एडविन बझ अल्ड्रिन, नील आर्मस्ट्राँग आणि मायकेल कॉलिन्स यांना घेऊन जाणारे अपोलो ११ यान १६ जुलै १९६९ रोजी चंद्रावर निघण्यास सज्ज झाले तेव्हा दहा लाख लोक साशंक मनाने हे उड्डाण पाहण्यास जमले होते. सर्वच खंडांमध्ये अमेरिकेच्या चंद्रवारीचे कुतूहल होते.
- साहित्यिक, कवी आणि चित्रकर्त्यांना या विषयाने बरेच खाद्य पुरविले. या मोहिमेच्या यशस्वीतेनंतरही ती खोटी असल्याचे षड्यंत्र सिद्धांत कित्येक वर्षे लढविले गेले. मात्र सर्वच षड्यंत्र सिद्धांतांना मागे टाकत मानवतेच्या उत्तुंग झेपेची पन्नाशी आज साजरी केली जात आहे. त्याचबरोबर आर्टेमिस कार्यक्रमाअंतर्गत पुन्हा चांद्रमोहीम आखली जात आहे. आता चीन चंद्रावर माणूस पाठवण्याच्या तयारीत असल्याने अमेरिकेलाही पुन्हा चंद्रावर माणूस पाठवण्याची घाई झाली आहे.
आदर्श व्यक्तींच्या यादीमध्ये मोदींनी रोनाल्डोलाही मागे टाकले :
- ब्रिटनमधील ‘योगोव्ह’ या अंतरराष्ट्रीय मार्केट रिसर्च आणि डेटा अनलिसीस करणाऱ्या कंपनीने जगभरातील आदर्श घ्यावा अशा व्यक्तींची यादी तयार केली आहे. तर मागील वर्षीप्रमाणे यंदाही या यादीमध्ये मायकोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे पहिल्या स्थानी कायम आहेत. मात्र या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बढती मिळली आहे. मागच्या वर्षी या यादीत आठव्या
- क्रमांकावर असणारे मोदी यंदा सहाव्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे मोदी यांनी या यादीत पोर्तुगालचा लोकप्रिय फुटबॉलपटू आणि इटलीच्या युवेंटसचा मुख्य खेळाडू असणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही मागे टाकले आहे.
- तसेच जगभरातील लोक कोणाला आपला आदर्श मानतात यासंदर्भात ‘योगोव्ह’ने यंदा 41 देशांमधील नागरिकांची मते जाणून घेतली. या सर्वेक्षणामध्ये 42 हजारहून अधिक जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर जगातील सर्वात प्रभावशाली 20 पुरुष आणि 20 महिलांची यादी तयार करण्यात आली.
18 वर्षीय ऐश्वर्यची वर्ल्ड रेकॉर्ड कामगिरी :
- मध्य प्रदेशमधील खारगाव जिल्ह्यातल्या ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने जर्मनीत सुरू असलेल्या कनिष्ठ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच 18 वर्षीय ऐश्वर्यने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात 459.3 गुणांच्या कमाईसह सुवर्णपदक नावावर केले. या कामगिरी सह त्यानं कनिष्ठ गटातील विश्वविक्रमही नावावर केला.
- तर या स्पर्धेत भारताचे हे दहावे सुवर्णपदक ठरले. भारतीय संघ 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 4 कांस्यपदक अशा एकूण 23 पदकांसह अव्वल स्थानावर आहे. या स्पर्धेत हंगेरीच्या पेक्लर झलानने 454.8 गुणांसह रौप्य, तर चीनच्या चँगहाँग झँगने 442.8 गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. ऐश्वर्यने यापूर्वी 2019च्याच आशिआई अजिंक्यपद स्पर्धेतील कनिष्ठ गटात कांस्यपदक जिंकले होते.
No comments