Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 17 July 2019

घरगुती वीज वापरासाठी लवकरच प्रिपेड सुविधा : घरात पंखे, दिवे, एसी आणि इतर वीजेवर चालणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरण्यासाठी आता ग्राहकांना आधीच वीज मंडळाकडे पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतरच त्यांना वीज पुरवठा होणार आहे. अर्थात केंद्…

घरगुती वीज वापरासाठी लवकरच प्रिपेड सुविधा :
  • घरात पंखेदिवेएसी आणि इतर वीजेवर चालणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरण्यासाठी आता ग्राहकांना आधीच वीज मंडळाकडे पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतरच त्यांना वीज पुरवठा होणार आहे. अर्थात केंद्र सरकार आता घरगुती वीज वापरासाठी प्रिपेड सुविधा देशभरात लागू करण्याच्या तयारीत असून वीज वापरानंतर पैसे भरण्याची पद्धत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील घरांमध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत.
  • केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी या योजनेबाबत सांगितले कीभारत आता वीज क्षेत्रात एक नवी व्यवस्था निर्माण करु पाहत आहेयामध्ये वीज ग्राहकांना आधीच वीज मंडळाकडे पैसे भरावे लागतील त्यानंतरच त्यांना वीज वापरता येणार आहे. तसेच राज्यांना समाजातील गरीब वर्गाला मोफत वीज देण्याचा पर्यायही खुला असणार आहे. मात्रयासाठी त्यांना आपल्या बजेटमधून वीज वापराचे पैसे भरावे लागतील.
  • तर प्रिपेड मीटरमुळे ग्राहकांना घरपोच बील पाठवण्याची कटकट संपेल. वीज कंपन्यांवर थकीत वीजबीलांचा भार राहणार नाही. त्याचा परिणाम म्हणजे वीज कंपन्यांची स्थिती सुधारेल. त्यामुळे ही सेवा अधिकाधिक सक्षम होण्यास मदत होईल. यामुळे खऱ्या अर्थाने वीज क्षेत्रात क्रांती येईल.

विजयवीरला तिसरे सुवर्णपदकतालिकेत भारत प्रथम :
  • भारताचा नेमबाज विजयवीर सिद्धू याने जर्मनीच्या सुहल येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक ज्युनिअर नेमबाजीत मंगळवारी राजकंवरसिंग आणि आदर्शसिंग यांच्यासोबतीने पुरुषांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण जिंकले. विजयवीरचे हे तिसरे सुवर्ण ठरले.
  • भारताने पदक तालिकेत अव्वल स्थान कायम राखले असून७ सुवर्णांसह एकूण १६ पदकांची कमाई झाली. भारताला दुसऱ्या दिवशी दुसरे पदक पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात हृदय हजारिकायशवर्धन आणि पार्थ माखिजा यांच्या संघाने मिळवून दिले.
  • या तिघांनी १८७७.४ गुणांसह रौप्य जिंकले. चीनला सुवर्ण मिळाले. या दरम्यान चीनने विश्वविक्रमाची देखील बरोबरी केली. ज्युनिअर विश्व चॅम्पियन हृदयला दहा मीटर एअर रायफल प्रकारात धक्का बसला.

अमेरिकेतील लुइसियाना आणि संपूर्ण खाडी किनारपट्टीवर उष्ण कटिबंधीय वादळ बॅरी :
  • सेंट्रल लुइसियाना किनार्यावरील (अमेरिकेत) श्रेणी 1 प्रकारचे उष्ण कटिबंधीय वादळ बॅरी निर्माण झाले आहे. अटलांटिक हंगामाचे हे पहिले चक्रीवादळ थोड्याच वेळात उत्तर-पश्चिम लुइसियानावर येऊन कमी झालेपरंतु त्याच्या जोरदार पावसामुळे स्थानिक लोकांना खूप त्रास झाला आहे.
  • बॅरीचा मार्ग न्यू ऑर्लिन्सच्या पश्चिमी किनाऱ्यावर येताच सम्बन्धित खात्यांना दक्ष राहण्याचे निर्देश दिले गेलेयेथेच 14 वर्षापूर्वी (2005 मध्ये) चक्रीवादळ कॅटरीनाने शहराचा आणि आसपासच्या भागांत नुकसान केले होते.
  • जुलै 2019 च्या सुरुवातीलाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राज्यात आणीबाणीची घोषणा केली. या घोषणेमुळे लुइसियानाला फेडरल सहाय्य मिळण्यास सहज होईल.

रावसाहेब दानवेंचा भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा :
  • भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर दानवेंनी दिल्लीत याबाबत घोषणा केली आहे.
  • त्यामुळे आता राज्यातील आगामी विधानसभा निडवणुकांमध्ये भाजपाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागल्याने आता प्रदेशाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
  • विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने नवा प्रदेशाध्यक्ष नेमून त्याच्याकडे पक्षाच्या संघटनेची जबाबदारी सोपविली जाईल. केंद्रात पुन्हा मोदी सरकार आल्यावर रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

बाबा गुरु नानक इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी – पाकिस्तानमध्ये याची पायाभरणी :
  • बाबा गुरु नानक युनिव्हर्सिटी (BGNU) ची पायाभरणी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात नांकना साहिब येथे करण्यात आली. पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुजदर यांनी विद्यापीठाची पायाभरणी केली.
  • 25 जुलैला शिरोमणि गुरुद्वारा व्यवस्थापक कमिशनने आंतरराष्ट्रीय नगर कीर्तन सुरू करण्याआधी हे कार्य करण्यात आले आहे. नांकना साहिब हे शिखांचे संस्थापक बाबा गुरु नानक देव यांचे जन्मस्थान आहे. बीजीएनयू 10 एकरांवर पसरलेले आहे आणि 258 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम याच्या बांधकामासाठी वापरली जाईल.

स्मृती मानधना आणि रोहन बोपण्णा यांना अर्जुन पुरस्कार प्रदान :
  • भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि टेनिसपटू रोहन बोपण्णा यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारताचे क्रीडा मंत्रा किरेन रिजिजू यांच्या हस्ते स्मृती आणि रोहन यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • तसेच गेल्या वर्षभरात स्मृती आणि रोहन यांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यामुळे दोन्ही खेळाडूंच्या संघटनांनी त्यांच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली होती. या शिफारशीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि या दोघांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

No comments