Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

बिमल जालन यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेची समिती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा राखीव निधी जास्तीत जास्त किती असावा याची निश्चिती करण्यासाठी सहा तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालन अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून राकेश मोहन…

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा राखीव निधी जास्तीत जास्त किती असावा याची निश्चिती करण्यासाठी सहा तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालन अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून राकेश मोहन हे समितीचे उपाध्यक्ष असतील.

या समितीला ९० दिवसांत त्यांचा अहवाल सादर करावा लागणार आहे. १९ नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या बैठकीत आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाने केंद्रीय बँकांच्या फ्रेमवर्कची समीक्षा करण्यासाठी तज्ज्ञाची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे. ही समिती आरबीआयचा आर्थिक भांडवल आराखडा निश्चित करेल.

No comments