Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) ‘एम.पी. बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2019’ हा पुरस्कार कोणी जिंकला?
A) जयंत नारळीकर
B) थानू पद्मनाभन
C) एम. एस. रघुनाथन
D) गोविंद स्वरूप
2) व्यक्तीच्या नावावरून लघुग्रहाचे नाव ठेवण्यात आलेल्या पहिल्या भारतीयाचे नाव काय आहे?
A) किशोरी आमोनकर
B) भीमसेन जोशी
C) जसराज
D) रतन मोहन शर्मा
3) ‘बाथुकम्मा’ हा ________ राज्यात साजरा होणारा वार्षिक फुलोत्सव आहे.
A) आसाम
B) तेलंगणा
C) उत्तरप्रदेश
D) बिहार
4) कोणत्या राज्य सरकारने वायू प्रदूषणाला लढा देण्यासाठी भारतातली प्रथम ‘एमिशन ट्रेडिंग स्कीम’ (ETS) प्रस्तुत केली?
A) गुजरात
B) केरळ
C) तामिळनाडू
D) कर्नाटक
5) दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या खनिजाचे नाव काय आहे?
A) टिनूनकुलाईट
B) निक्सोनाईट
C) बॅझिंगा
D) गोल्डस्च्मिडटाईट
6) नुकत्याच सापडलेल्या गुरु ग्रहासारख्या ग्रहाचे नाव काय आहे?
A) GJ 3512 b
B) TG387
C) K2-293b
D) K2-294b
उत्तरे
1. (B) थानू पद्मनाभन
प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि कॉसमॉलॉजिस्ट थानू पद्मनाभन यांनी प्रतिष्ठित ‘एम.पी. बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2019’ जिंकला आहे. ‘एम.पी. बिर्ला मेमोरियल पुरस्कार’ 1993 सालापासून अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात दिला जात आहे.
2. (C) जसराज
भारतीय शास्त्रीय संगीतकार पंडित जसराज यांच्या नावावरून आंतरराष्ट्रीय खगोलीय संघ (IAU) या संघटनेनी मंगळ व गुरु ग्रहांच्या दरम्यान असलेल्या लघुग्रहांच्या पट्ट्यामधील एका लघुग्रहाचे नाव ठेवण्यात आले आहे. त्या लघुग्रहाला 'पंडितजसराज (300128)' हे नाव देण्यात आले आहे.
3. (B) तेलंगणा
29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत तेलंगणा राज्यात वरंगल जिल्ह्यात ‘बाथुकम्मा’ नावाचा वार्षिक फुलोत्सव साजरा होत आहे.
4. (A) गुजरात
गुजरात राज्य सरकारने वायू प्रदूषणाला लढा देण्यासाठी भारतातली प्रथम ‘एमिशन ट्रेडिंग स्कीम’ (ETS) प्रस्तुत केली आहे. ही बाजारपेठ आधारित प्रणाली आहे, जेथे राज्य सरकार कार्बन उत्सर्जनाच्या संदर्भात भांडवल तयार करणार आणि जे उद्योगांना त्या भांडवली मर्यादेच्या खाली राहण्यासाठी परमिट (किलोग्रॅममध्ये) यांची खरेदी-विक्री करण्यासाठी परवानगी देते.
5. D) गोल्डस्च्मिडटाईट
दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या खनिजाचे नाव “गोल्डस्च्मिडटाईट” हे आहे. हे खनिज एका खाणीतून सापडलेल्या हिर्याच्या आत सापडले आहे
6. A) GJ 3512 b
आपल्या सूर्यापासून 30 प्रकाशवर्षांच्या अंतरावर नुकत्याच सापडलेल्या एका छोट्या तार्याभोवती फिरत असलेल्या एका ग्रहाला “GJ 3512 b” हे नाव देण्यात आले आहे. हा ग्रह गुरु ग्रहासारखाच असून त्यावर विविध वायूंचे अत्याधिक प्रमाणात ढग आहेत.
No comments