Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) ________ येथे INS ‘नीलगिरी’ हे स्टील्थ फ्रिगेट लढाऊ जहाज सागरी चाचण्यांसाठी अनावरीत करण्यात आले.
A) कोलकाता
B) मुंबई
C) केरळ
D) बेंगळुरु
2) के. के. बिर्ला फाउंडेशनच्यावतीने दिल्या जाणार्या ‘28 व्या सरस्वती सन्मान’चा विजेता कोण आहे?
A) के. शिव रेड्डी
B) जावेद अख्तर
C) गिरीश कर्नाड
D) भार्गवी राव
3) कोणता आपत्कालीन क्रमांक दिल्ली सरकारने अग्निशमन, रुग्णवाहिका आणि पोलीस आपत्कालीन सेवांसाठी कार्यरत केला?
A) 122
B) 199
C) 202
D) 112
4) भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे?
A) आर.के.एस. भदौरिया
B) एच. एस. अरोरा
C) रघुनाथ नांबीयर
D) बी. सुरेश
5) ‘जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता क्रमवारीता 2019’ यामध्ये भारताचे स्थान काय आहे?
A) 41 वा
B) 46 वा
C) 44 वा
D) 48 वा
6) कोणत्या भारतीय कंपनीला ‘यूनायटेड नेशन्स ग्लोबल क्लायमेट अॅक्शन अवॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
A) विप्रो
B) एचसीएल
C) झेनपॅक
D) इन्फोसिस
उत्तरे
1. (B) मुंबई
भारतीय नौदलाचे पहिले नवीन स्टील्थ फ्रिगेट ठरलेले INS ‘नीलगिरी’ हे लढाऊ जहाज मुंबईत अनावरीत करण्यात आले आहे. हे ‘प्रोजेक्ट 17A’ अंतर्गत तयार करीत असलेल्या सहा मधले पहिले जहाज आहे. त्याची बांधणी मझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) या कंपनीने केली.
2. (A) के. शिव रेड्डी
के. के. बिर्ला फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘28 व्या सरस्वती सन्मान’ या सोहळ्यात तेलुगू कवी के. शिव रेड्डी यांना सरस्वती सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे. भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला.
3. (D) 112
दिल्ली सरकारने एकाच जागी अग्निशमन, रुग्णवाहिका आणि पोलीस या आपत्कालीन सेवांना उपलब्ध व्हाव्या यासाठी ‘112’ हा आपत्कालीन क्रमांक कार्यरत केला आहे.
4. (B) एच. एस. अरोरा
एच. एस. अरोरा ह्यांची भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती आर.के.एस. भदौरिया यांच्या जागेवर झाली आहे.
5. (C) 44 वा
स्वित्झर्लंडच्या IMD संस्थेचा भाग असलेल्या ‘वर्ल्ड कॉम्पिटीटिव्हनेस सेंटर’ या विभागाकडून ‘जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता क्रमवारीता 2019’ या शीर्षकाखाली जागतिक स्पर्धात्मकतेच्या बाबतीत एक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत यंदा भारताने चार स्थानांची प्रगती दाखवीत 44 वे स्थान प्राप्त केले आहे.
6. (D) इन्फोसिस
इन्फोसिस या भारतीय सॉफ्टवेअर कंपनीला कार्बन-न्यूट्रल श्रेणीच्या अंतर्गत ‘यूनायटेड नेशन्स ग्लोबल क्लायमेट अॅक्शन अवॉर्ड 2019’ प्राप्त झाला आहे.
No comments